ETV Bharat / state

पुण्याच्या प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या अखेर जेरबंद; पिंजऱ्यात अडकला - राजीव गांधी प्राणी संग्रहालय

Leopard Escapes From Pune Zoo : पुण्यातील कात्रज परिसरात असलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्यानं धूम ठोकली होती. हा बिबट्या कर्नाटकवरुन पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयात आणण्यात आला होता. त्याला विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. मात्र विलगीकरण कक्षातून तो पसार झाला होता. आता त्याला अखेर 48 तासानंतर जेरबंद करण्यात आलंय.

Leopard Escapes From Pune Zoo
घटनास्थळावर दाखल झालेलं अग्निशमन दलाचं वाहन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 11:24 AM IST

Updated : Mar 5, 2024, 10:48 PM IST

पुणे Leopard Escapes From Pune Zoo : कर्नाटकवरुन आणलेला बिबट्या पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून पळाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून नर बिबट्या सोमवारी पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी प्रशासनाकडू मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू होती. अग्निशामक दलाकडून अतिरिक्त 3 वाहनं आणि पीएमआरडीएचे अग्निशमन वाहन ही दाखल झालं होते. जवळपास 12 तासहून अधिक काळापासून प्रशासनाच्या मदतीनं शोधकार्य सुरू होतं. या बिबट्याला थर्मल ड्रोननं शोधण्यात येत असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं दिली होती. अखेर मंगळवारी रात्री अशिरा या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय.

हंप्पीतील प्राणी संग्रहालयातून आणला होता बिबट्या : कात्रज इथं पुणे महापालिकेचं प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात काही दिवसांपूर्वी हंप्पी इथल्या अटलबिहारी वाजपेयी प्राणी संग्रहालयातून तरस, चौसिंगे आणि बिबट्याला आणण्यात आलं होतं. या बिबट्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी त्यानं विलगीकरण कक्षातून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली.

युद्धपातळीवर शोधमोहीम होती सुरू : कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून कर्नाटकमधून आणलेल्या बिबट्यानं धूम ठोकली होती. हा बिबट्या प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षातून पळाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या बिबट्य़ाला शोधण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली होती. या बिबट्याला विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याची माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली. पळालेला बिबट्या हा प्राणी संग्रहालयातच असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. "प्रशासनानं त्याच्या शोधासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात येत आहे," अशी माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली होती. अखेर 48 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. बापरे बिबटे वाढलेत बरं का! भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या महाराष्ट्राचा नंबर कितवा?
  2. बिबट्याची दहशत कायम; अहमदनगरच्या अंबिका नगरमध्ये एकावर हल्ला, पाहा व्हिडिओ
  3. पाण्याचा शोध आला जिवाशी; बिबट्याची मान अडकली पाण्याच्या हंड्यात, पाच तासानंतर सुखरुप सुटका

Last Updated : Mar 5, 2024, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.