ETV Bharat / state

कमला नेहरु रुग्णालयाची 'कमाल'! सातव्या महिन्यातच प्रसूत झालेल्या १ किलोच्या बाळाला दिलं जीवदान, अनेक आजारातून केलं मुक्त - Kamala Nehru Hospital

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 3:44 PM IST

Updated : Jul 27, 2024, 5:34 PM IST

Kamala Nehru Hospital : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय वरदान ठरत आहे. गरोदर प्राजक्ता कांबळे वय 25 या 8 जून रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांची सातव्या महिन्यातच प्रसूती झाली आणि त्यांनी मुलाला जन्म दिला. जन्मतः अर्भकाचं वजन एक किलो होतं. या अर्भकावर 45 दिवस उपचार सुरू होते. आत्ता हे बाळ पूर्णपणे ठणठणीत बरं झालं आहे.

Pune Baby News
प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळ (Source - ETV Bharat Reporter)

पुणे Kamala Nehru Hospital : 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असल्याचं म्हणत आजही अनेक डॉक्टर हे रुग्णांची सेवा करत असतात. पुणे महापालिकेच्या मंगळवार पेठेत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांच्या एनआयसीयूमध्ये असलेल्या एक किलो वजनाच्या बाळाला अनेक आजार असताना देखील डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीनं बाळ आता पूर्णपणे बरं झालंय.

प्रतिक्रिया देताना डॉक्टर (Source : ETV Bharat Reporter)

बाळ पूर्णपणे ठणठणीत : पुण्यातील मंगळवार पेठ येथील कमला नेहरू रुग्णालयात प्राजक्ता कांबळे (वय 25) या 8 जून रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांची सातव्या महिन्यातच प्रसूती झाली. त्यांनी जन्म दिलेल्या मुलाचं वजन एक किलो होतं. या बाळाचं नाव हे शंभू अजय कांबळे असं आहे. जन्म झाल्यावर या बाळाला अनेक आजार होते. जवळपास 45 दिवस एनआयसीयु मध्ये दाखल असून त्याच्यावर अनेक उपचार सुरू होते. आता हे बाळ पूर्णपणे ठणठणीत बरं झालं आहे. बाळ आणि आई प्राजक्ता कांबळे यांना 23 जुलैला डिस्चार्ज देण्यात आला.

अनेक आजार तरीही बाळ सुखरूप : बालरोगतज्ञ डॉ. स्मिता सांगडे म्हणाल्या, "प्राजक्ता कांबळे या 8 जून, 2024 रोजी कमला नेहरू रुग्णालयात सात महिन्याच्या गरोदर असताना दाखल झाल्या. त्यावेळी इमरजन्सी सिझेरियन करण्यात आलं. बाळाचं वजन जन्मतः 1.1 किलो होतं. बाळ कमी वजनाचं आणि कमी दिवसाचं असल्यामुळे त्याला डॉक्टर्सच्या टीमनं एनआयसीयू मध्ये दाखल केलं. एनआयसीयूमध्ये बाळाला आणल्यावर बाळाला लगेच व्हेंटिलेटर सपोर्टवर घेण्यात आलं आणि सरफॅक्टन्ट औषध देण्यात आलं. बाळ 8 दिवस व्हेंटिलेटर सपोर्टवर होतं तर पुढच्या 7 दिवसात ऑक्सिजन देण्यात आला."

45 दिवसानंतर डिस्चार्ज : जन्माच्या पंधरा दिवसानंतर ऑक्सिजन काढण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बाळाला थोड्या प्रमाणात आईचं दूध तोंडातून नळीनं देण्यात आलं. हळूहळू दुधाचं प्रमाण वाढविण्यात आलं. 23 व्या दिवशी बाळाला तोंडानं दूध देण्यास चालू केलं. आईचा ब्लड ग्रुप आरएच निगेटिव्ह आणि बाळाचा रक्त गट आरएच पॉझिटिव्ह असल्यामुळे बाळाला आरएच इनकंपटिब्लिटीमुळे कावीळ झाली. त्यामुळं फोटोथेरपी देऊन त्याचे उपचार करण्यात आले. वयाच्या 15 दिवसापासून बाळाला कांगारू मदर केअर म्हणजे बाळाला आईजवळ देणं चालू केलं. बाळाला जंतुसंसर्ग झाल्यामुळे अँटिबायोटिक औषधे द्यावी लागली. हृदयाचे ठोकेही जास्त असल्यामुळे 2DECHO करण्यात आली. त्यामध्ये हृदयाची तपासणी PPHN (परसिस्टंट पल्मनरी हायपरटेशन) असल्याचं निदान झालं. खूप दिवस व्हेंटिलेटर मशीनवर असल्यामुळे बाळाचं अंधत्व टाळण्यासाठी ROP स्क्रिनिंग तपासणी केली. 45 दिवसानंतर बाळाला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्या बाळाचं वजन 1.5 किलो होतं. बाळाला घरी सुखरूप सोडण्यात आलं, असं डॉ. सांगळे यांनी सांगितलं.

बाळाचा जीव वाचला : "जेव्हा आईची सातव्या महिन्यात डिलिव्हरी होते तेव्हा जे बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला अनेक समस्या निर्माण होतात. त्यात जर बाळ हा कमी वजनाचं जन्माला आलं तर त्याला अनेक धोके असतात. या बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याला देखील अनेक आजार होते. त्याचा जन्म देखील सातव्या महिन्यात झाला. त्यामुळं त्याचं वजनही फक्त एक किलो होतं. पण आमच्या रुग्णालयातील एनआयसीयूमधील टीमने चांगलं काम केल्यामुळे बाळाचा जीव वाचला ते ठणठणीत देखील आहे." असं डॉ. सांगळे यांनी सांगितलं.

बाळाचं एक किलो वजन : "गेल्या काही वर्षात कमला नेहरू येथे सुरू करण्यात आलेल्या एनआयसीयुमुळे अनेक गुंतागुंतीची तसंच कमी वजनाची जी बाळं असतात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. कमला नेहरू येथील एनआयसीयू (नवजात शिशु बालकांचा अतिदक्षता विभाग) मध्ये 20 बेड, 5 व्हेंटीलेटर मशीन आहेत. इथे कमी दिवसांची कमी वजनाची बाळं, जन्मजात दोष असलेली जसं की दुभंगलेले ओठ, दुभंगलेला टाळू यांचे उपचार होतात. नवजात बालकांच्या कावीळवर तसंच त्वचा रोगावर उपचार होतात. वर्षभरात 1700 बालक झाली होती तर 556 कमी वजनाची बाळं होती. महत्त्वाचं म्हणजे आमचा डेथ रेट हा देखील 1 टक्का असून आमच्याकडे मोफत उपचार होतात. कमला नेहरू रुग्णालयात एका आईला जुळं बाळ जन्माला आल्यानंतर एका बाळाचं वजन देखील एक किलो असताना त्याच्यावर देखील योग्य उपचार करत त्याला बरं करण्यात आलं." असं वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. अवघे पाऊणशे वयमान, पण कीर्ती किती महान..., 75 वर्षीय पुष्पा चौधरी यांची क्रीडा क्षेत्रातील आगळीवेगळी कहाणी - Amravati News
  2. लुप्त झालेला रानपिंगळा 117 वर्षानंतर आला जगासमोर, मेळघाटात रानपिंगळ्याचा 'फालतू' शोध! - Amravati Ranpingla

Last Updated : Jul 27, 2024, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.