ETV Bharat / state

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून जन्मदात्या पित्यानं पोटच्या तीन मुलांचा खून करुन मृतदेह फेकले विहिरीत - Ambad Murder News - AMBAD MURDER NEWS

Ambad Murder News : पित्यानंच आपल्या पोटच्या तीन मुलांचा खून केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव शिवारात उघडकीस आलीय. यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

Ambad Murder News
जन्मदात्या पित्यानं पोटच्या तीन मुलांचा खून करुन मृतदेह फेकले विहिरीत; स्वतःच झाला पोलीस ठाण्यात हजर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 8:51 AM IST

Updated : Apr 15, 2024, 2:29 PM IST

जन्मदात्या पित्यानं पोटच्या तीन मुलांचा खून करुन मृतदेह फेकले विहिरीत

अंबड/वडीगोद्री (जालना) Ambad Murder News : पित्यानंच आपला एक मुलगा व दोन मुलींचा खून करुन मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना रविवार 14 मार्च रोजी उघडकीस आलीय. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगाव शिवारात ही घटना घडली आहे. ही तिन्ही भावंडं संभाजीनगर जिल्ह्यातील काद्राबाद कचनेर येथील रहिवाशी आहेत. संतोष ताकवाले असं आरोपी पित्याचं नाव आहे.

खून करुन मृतदेह फेकले विहिरीत : याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कचनेर जवळील काद्राबाद ता. जि. संभाजीनगर येथील संतोष धोंडीराम ताकवाले हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. या व्यक्तीविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. अंबड तालुक्यातील डोमेगाव हे संतोष ताकवाले याच्या मामाचं गाव आहे. दोन दिवसापूर्वी संतोष हा आपल्या तीन मुलांना घेऊन डोमेगाव इथं आला. त्यानं तिन्ही मुलांचा खून करुन डोमेगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये तिन्ही मृतदेह टाकले. या विहिरीला पाणी कमी असल्यानं रविवारी तिन्ही मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत होते. यानंतर आरोपीनं स्वतः फोन करुन पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ८ वाजता अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं.

आरोपी ताब्यात तपास सुरु : सोहम संतोष ताकवाले (12), शिवानी संतोष ताकवाले (5), अमृता संतोष ताकवाले (6) अशी तीनही मृत भावंडांची नावं आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोषला ताब्यात घेण्यात आलंय. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. जन्मदात्या पित्यानंचं आपल्या तीन अपत्यांना का ठार केलं? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयातून खून : संतोष धोंडीराम ताकवले याला दोन पत्नी आहेत, ज्या तीन मुलांचा त्यांनी निर्दयपणे खून केला ही मुलं पहिल्या पत्नीचे आहेत, तर दुसरी पत्नी ही पाचोड इथं वास्तव्यास असल्याची प्रार्थमिक माहिती सूत्रांकडून मिळालीय. त्याचं पहिल्या पत्नीसोबत वारंवार वादविवाद होत असे, तुझे बाहेर अनैतिक संबंध आहे असं म्हणून वारंवार मारहाण व शारीरिक व मानसिक त्रास देत असे आणि या संशयातूनच त्यानं आपल्या घराची राख रांगोळी करत आपल्या पोटच्या तीन मुलांना ठार केलंय. या घटनेनंतर संतोष हा फरार झाला होता अखेर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला छत्रपती संभाजी नगर शहरातील बाबा पेट्रोल पंपजवळील ट्रॅव्हल्स पार्किंग परिसरातून ताब्यात घेतलंय.

हेही वाचा :

  1. मैत्रिणीचं अपहरण करत मागितली खंडणी, पैसे मिळाल्यानंतरही खून करणाऱ्या तिघांना अटक - Pune Murder News
  2. बाबा तरसेम सिंह हत्या प्रकरण : उत्तराखंड एसटीएफनं एका मारेकऱ्याला घातलं कंठस्नान - Baba Tarsem Singhs murder
  3. पानठेल्यावर सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना - Nagpur Murder News

Last Updated : Apr 15, 2024, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.