ETV Bharat / state

मुंबई सेंट्रल-जयपूर रेल्वे गोळीबार प्रकरण; दोन रेल्वे कॉन्स्टेबलना केलं बडतर्फ - Jaipur Mumbai Train Firing

Jaipur Mumbai Train Firing Case : जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंहला (Chetan Singh) सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणी दोन रेल्वे कॉन्स्टेबल यांना रेल्वेतून बडतर्फ करण्यात आलंय.अमय आचार्य (Amay Acharya) आणि नरेंद्र परमार (Narendra Parmar) असं बडतर्फ केलेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे.

Jaipur Mumbai Train Firing
मुंबई सेंट्रल-जयपूर रेल्वे गोळीबार प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 7:44 PM IST

मुंबई Jaipur Mumbai Train Firing Case : रेल्वे कॉन्स्टेबल चेतन सिंग (Chetan Singh) यानं 31 जुलै 2023 रोजी मुंबई सेंट्रल ते जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनमध्ये (Jaipur SF Express Railway) गोळीबार केला होता. ट्रेन सुरू असतानाच चेतन सिंग यानं डब्यातील प्रवासी नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर त्याला अटक करून खटला दाखल केला होता. दरम्यान, याबाबत एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आलीय. या प्रकरणी दोन रेल्वे कॉन्स्टेबल यांना रेल्वेतून बडतर्फ करण्यात आलंय.

कर्तव्य चोखपणं बजावण्यात अपयश : गोळीबाराची घटना जेव्हा ट्रेनमध्ये घडली होती. त्यावेळी रेल्वे कॉन्स्टेबल अमय आचार्य (Amay Acharya) आणि नरेंद्र परमार (Narendra Parmar) हे कर्तव्यावर होते. परंतु दोघांना ही या दुर्दैवी घटनेवर नियंत्रण मिळविण्यास अपयश आलं होतं. त्यानी आपलं कर्तव्य चोखपणं बजावलं नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारणामुळं त्यांना रेल्वेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा गोळीबाराची घटना घडली तेव्हा मात्र अमय आचार्य हे घटनास्थळी नव्हते, तर तो रेल्वेच्या बाथरूममध्ये जाऊन लपून बसले होते. तोपर्यंत आरोपीनं एका प्रवाशाचा खून केला होता. याबाबत अमय आचार्य यांनी हा खुलासा केला होता. परंतु त्यांनी चोखपणं कर्तव्य बजावलेच नाही, असा रेल्वे सुरक्षा दलाचा अहवाल सांगतो. त्या आधारे विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त के. एस. राठोड यांनी अमय आचार्य आणि नरेंद्र परमार या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलला कर्तव्यात कसूर केल्यामुळं बडतर्फ केलं आहे.

काय आहे प्रकरण? : 31 जुलै 2023 रोजी सकाळी मुंबईतून मुंबई-जयपुर सुपरफास्ट एक्सप्रेस निघाल्यानंतर पालघरजवळ चेतन सिंग याने डब्यामध्येच चार व्यक्तींवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा खून केला होता. यानंतर त्याला पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पकडले होते. चेतन सिंग याने सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना शिवाय चार प्रवासी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार पालघर, नालासोपारा येथील निवासी अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन तसेच बिहार येथील निवासी अजगर अब्बास बेग, सय्यद एस यांचा देखील मृतांमध्ये समावेश होता. यानंतर चेतन सिंग याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता या प्रकरणी दोन रेल्वे कॉन्स्टेबल यांना बडतर्फ करण्यात आलंय.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद : जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करताना आरपीएफ जवान चेतन सिंह चौधरी (वय 33) याने एका बुरखाधारी महिलेलाही रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणायला भाग पाडले होते. यावेळी महिलेने त्याच्या रायफलला हात लावल्यानंतर त्याने तिला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. जयपूर एक्स्प्रेसच्या बी 3 कोचमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला होता. ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला होता.

हेही वाचा -

  1. Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील घटना कशी घडली? जीआरपीने गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा केला उभा
  2. Jaipur Mumbai Train Firing: जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंह सेवेतून बडतर्फ
  3. Jaipur Mumbai Train Firing: जयपूर मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण; चेतन सिंहला न्यायालयीन कोठडी, नार्को चाचणीची याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.