ETV Bharat / state

ठरलं! महायुती-महाविकास आघाडीतील जागावाटपाचं चित्र स्पष्ट, वाचा कुणाला किती जागा? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Maharashtra seat allocation issue resolved : राज्यात महायुतीसह महाविकास आघाडीचं जागवाटप जवळपास निश्चित झालं आहे. पालघरची जागा वगळता राज्यात जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या असून उद्धव ठाकरे यांच्या गटाला 21 जागा मिळाल्या आहेत.

Maharashtra seat allocation issue resolved

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 10:32 PM IST

Updated : May 1, 2024, 11:07 PM IST

मुंबई Maharashtra seat allocation issue resolved : लोकसभा निवडणुकीचं दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीचं काही जागांवर एकमत होत नव्हतं. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा कायम होता. मात्र आज (बुधवारी) अखेर महायुतीतील (पालघर जागेचा अपवाद वगळता) जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. तसंच महाविकास आघाडीचं यापूर्वीच सर्व ४८ जागा वाटपाचं निश्चित झालं आहे.

महाविकास आघाडीत कुणाला किती जागा? : महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) यांना सर्वांधिक 21 जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना (ठाकरे) 21 जागा : मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, आणि यवतमाळ-वाशिम

काँग्रेसला 17 जागा : मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, आणि जालना

राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार 10 जागा : सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, बारामती, शिरूर, अहमदनगर दक्षिण आणि बीड.

महायुतीत कुणाला किती जागा? : महायुतीत भाजपाच्या वाट्याला सर्वांधिक 28 जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटाला) 4, महादेव जानकर यांच्या 'रासप'ला 1 जागा मिळाली आहे. तर पालघरची जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्याबाबत भाजपा लवकरच निर्णय घेणार असल्याचं समजतंय.

भाजपाला 28 जागा : सांगली, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-मध्य, नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, दिंडोरी, भिवंडी, पुणे, बीड, लातूर, माढा, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया आणि पालघरची जागा भाजपालाच मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना (शिंदे गट) 15 जागा : ठाणे, नाशिक, कल्याण, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, मावळ, हिंगोली, संभाजीनगर, शिर्डी, कोल्हापूर, रामटेक, आणि हतकणंगले.

राष्ट्रवादी (अजित पवार) 4+1 : बारामती, रायगड, शिरुर, धाराशिव आणि महादेव जानकर यांच्या रासपला परभणीतून 1 जागा मिळाली आहे.

हे वाचलंत का :

  1. भाजपाच्या प्रचार सभेत पंतप्रधानपदी राहुल गांधींचं नाव; उत्तर ऐकून सगळेच झाले अवाक् - Lok Sabha Election 2024
  2. किरीट सोमैया यांनी महायुतीच्या भ्रष्ट उमेदवाराचा प्रचार करून दाखवावा, ठाकरे गटाचं आव्हान - accused Mahayuti candidates
  3. ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा; उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्केंनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 1, 2024, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.