ETV Bharat / state

योग दिनानिमित्त प्रथमच दिव्यांग मुलांसाठी योगाभ्यास वर्ग - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024

International Yoga Day 2024 : छत्रपती संभाजीनगरमध्ये योग दिनानिमित्त दिव्यांग मुलांसाठी प्रथमच विशेष योगचा सराव सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग मुलांना शारीरिक स्वास्थासोबतच मानसिक स्वास्थ जपण्यासाठी या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल्याचं योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे यांनी म्हटलं आहे.

International Yoga Day 2024
दिव्यांग मुलांसाठी योगभ्यास वर्ग (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 9:40 PM IST

छत्रपती संभाजीनगर International Yoga Day 2024 : भारतानं जगाला आजपर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात योगसाधना महत्त्वाचा भाग मानला जातो. पारंपारिक काळापासून योग हा सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयी महत्त्वाचा भाग आहे. मागील दहा वर्षापासून भारत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतोय. त्यामुळं जगाच्या पाठीवर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे, हे सर्वसामान्यांना कळतंय. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग देशात केले जात आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगर विभागात पहिल्यांदाच दिव्यांग मुंलासाठी योगचा विशेष सराव सुरू करण्यात आलाय. योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे गेल्या अनेक वर्षांपासून योग प्रशिक्षक म्हणून काम करत असून त्यांनी विशेष उपक्रम म्हणून मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत.

डॉ. उत्तम काळवणे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

दिव्यांग मुलांसाठी विशेष प्रशिक्षण : योग भारतानं जगाला दिलेलं एक वरदान आहे. प्राचीन काळापासून स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी या योगभ्यासाचा फायदा झालाय. जगानं देखील ते मान्य केलं आहे. मानसिक, शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी योग उपयुक्त ठरतोय. त्यामुळंच दिव्यांग मुलांना त्याचा फायदा व्हावा, याकरिता पहिल्यांदाच योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे तसंच आरंभ संस्था यांच्या माध्यमातून योग प्रशिक्षण सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग मुलांना शारीरिक स्वास्थासोबतच मानसिक स्वास्थ जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. यात अनेक जण तर स्वतःच्या हातानं कामही करू शकत नाहीत. अशाच मुलांना योग साधनेनं सक्षम करण्याकरता हा उपक्रम राबवला जातोय. मराठवाड्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग समजला जातोय. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित साधून आरंभ संस्थेत असलेल्या दिव्यांग मुलांसाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. योगसधनेनं शारीरिक स्वास्थ तर चांगलं राहीलच मात्र, त्यांचे मानसिक स्वास्थ देखील चांगलं ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केला.

25 वर्षापर्यंत दिव्यांग मुलांना प्रशिक्षण : शहरातील आरंभ दिव्यांग संस्था अनेक दिव्यांग मुलांचा सांभाळ करते. या संस्थेत असणाऱ्या मुलांना योग साधनेतून सक्षम करण्याचा पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे. वय वर्ष 5 ते 25 यामधील मुलांना योग साधनेचे काही प्रकार शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केलं. प्राणायामसारखे प्रकार रोज केल्यास शरीरावरील सुरू असलेल्या श्वासावर नियंत्रण मिळवता येते. तसंच शरीरातील व्याधी हळूहळू दूर सारता येऊ शकतात. शारीरिक स्वास्थ तर मिळेलच, मात्र मानसिक स्वास्थ बळकट झाल्यानं त्यांच्या आजारावर मात करणं देखील शक्य होईल. त्यामुळंच जागतिक योग दिनानिमित्त हा विशेष उपक्रम सुरू केला असून नियमित या मुलांना योग अभ्यास शिकवला जाईल. दिव्यांग मुलांना सक्षम करण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात. त्यात योग साधना निश्चित महत्वाची ठरेल, असा विश्वास आरंभ संस्थेच्या अंबिका टाकळकर यांनी माहिती दिली.

'हे' वाचलंत का :

  1. रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET
  2. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा: उद्धव ठाकरेंचं पारडं जड, समाजवादी पक्षाच्या आशाही उंचावल्या - Assembly Election 2024
  3. नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा! परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा - Supriya Sule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.