पुणे Pune Drug Case : पुणे पोलिसांनी चार हजार कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पुणे पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
देशातील विविध शहरांमध्ये कारवाई : पुणे पोलिसांची दहा पथके एनसीबीसह देशातील विविध शहरांमध्ये कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांचे पथक दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांसह अनेक गोदामांमध्ये ड्रग्जचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया, युवराज भुजबळ या पाच जणांना अटक केली. तसंच ड्रग्ज बनवणाऱ्या अभियंत्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
अमली पदार्थ प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या कारवाईत कुरिअर देशाबाहेर पाठवण्यात येणार होते. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत. तसंच तपासासाठी सांगली जिल्ह्यातील एका ठिकाणी पोलिसांचं पथक रवाना करण्यात येत आहे. अमली पदार्थमुक्त पुण्याला आमचं प्राधान्य आहे. 12 ते 15 पथके पुण्याबाहेरील विविध शहरात पाठवण्यात आली आहेत. - अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध? : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे पोलीस 'सॅम ब्राऊन' या नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा शोध घेत आहेत. सॅम नावाच्या या सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना 3 महिन्यांत 2000 किलो एमडी बनवण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. भुजबळ नावाच्या आरोपीला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला सॅम नावाच्या एका गृहस्थानं दिल्याचं बोललं जातं. त्यानंतर भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभमध्ये ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याची माहिती दिली आहे.
आतापर्यंत 1 हजार 700 किलो एमडी जप्त : पुणे पोलिसांनी आतापर्यंत ड्रग्जबाबत सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 1 हजार 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. यात पुणे, दिल्लीतील कारवाईचा समावेश आहे. तसंच दिल्लीतून आठ जणाला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या ड्रगची किमंत सुमारे 3100 हजार कोटी रुपये असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एमडी बनवायचा फॅार्म्युला होता. त्याला न्यू पुणे जॅाब असा कोड वर्ड देण्यात आला होता. न्यू पुणे जॅाबची भुजबळवर जबाबदारी होती. ॲाक्टोबर 2023 पासून ड्रग्जची निर्मिती सुरू होती.
कोणावर काय होती जबाबदारी?
- वैभव उर्फ पिंट्या माने : लोकल पेडलर लिंक
- अजय करोसिया : ड्रायव्हर
- हैदर शेख : सप्लायर
- भिमाजी साबळे : कंपनी मालक कुरकुंभ
- युवराज भुजबळ : केमिकल एक्सपर्ट
- दिवेश भुतिया: दिल्लीत गोडाऊन , फूड कुरियर सर्व्हिस
- संदीप कुमार : दिल्लीत गोडाऊन , फूड कुरियर सर्व्हिस
हे वाचलंत का :
Nashik Drug Case : ड्रग्सविरोधात मोर्चा मातोश्रीवर काढा; नितेश राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल- Nana Patole : नाशिक ड्रग्ज प्रकरणात काही आमदारांचा देखील सहभाग; पुरावे अधिवेशनात सादर करणार- नाना पटोले
- Sameer Wankhede News: समीर वानखेडे-क्रांती रेडकर दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित घेतले साईंचे दर्शन, 'हा' मागितला आशिर्वाद