ETV Bharat / state

देशातील पहिलं 'एअरबस ए ३५०' विमान प्रवाशांच्या सेवेत दाखल; जाणून घ्या काय आहे खास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 5:12 PM IST

Updated : Jan 23, 2024, 6:59 PM IST

Indias First Airbus A350 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Shivaji Maharaj International Airport) पहिल्यांदाच एअर इंडियाचे 'एअरबस ए-३५०' विमान दाखल झाले आहे. प्रवाशांना या विमानाच्या माध्यमातून सुखद प्रवासात अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवता येणार आहे.

Airbus
एअरबस विमान

मुंबई Indias First Airbus A350 : देशातील अग्रगण्य विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने पहिली 'एअरबस ए-३५०' विमान सेवा सुरू केलीय. फ्लाइट Al 589 ने सोमवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चेन्नईसाठी उड्डाण केलं आहे. या उड्डाणाने भारतीय विमान वाहतुकीच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झालीय. हे विमान जगातील अत्यंत प्रगत आणि आरामदायी मानले जात आहे.

प्रवास होणार आरामदायक : एअरबस ए-३५० विमानसेवा सध्या आंतरदेशीय मार्गावर चालणार आहे. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईतील प्रवाशांना या विमानाच्या माध्यमातून अधिक आरामदायक प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवता येणार आहे. वर्षभरापूर्वी एयर इंडियाने A350-470 नवीन विमानांची ऑर्डर दिली होती. आंतरदरेशीय मार्गावरील सेवेनंतर सदर एयरबस आंतरराष्ट्रीय मार्गावर तैनात करण्यात येणार आहे. या विमानाच्या समावेशानंतर एयर इंडियाचा ताफा अधिकच बळकट होणार आहे.

Indias first Airbus A350
अत्याधुनिक एअरबस ए-३५०

अशी आहे रचना : या विमानात तीन श्रेणीत एकूण ३१६ आसने असणार आहेत. यामध्ये फ्लॅट बेडसह २८ बिझनेस सूट, २४ प्रिमियम इकॉनॉमी सूट तर २६२ इकॉनॉमी श्रेणीतील आसनांचा समावेश आहे. ही सर्व आसने अत्यंत आरामदायी, मनोरंजनासाठी अत्याधुनित एचडी स्क्रिन उपलब्ध असणारी आहेत. जेणेकरुन प्रवाशांना प्रवासाचा थकवा येणार नाही. या विमानाच्या इंजिनाबाबत अधिक माहिती अशी की, एयरबस विमानाचे इंजन इतर विमानांपेक्षा 20 टक्के अधिक कार्यक्षम आहे.

तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी : एअरबस A350 विमान हे एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगसोबत जून 2023 मध्ये स्वाक्षरी केलेल्या 470 विमानांच्या रेकॉर्ड सेटिंग ऑर्डरचा भाग आहे. VT-JRA म्हणून नोंदणीकृत पहिले एअरबस A350-900, 23 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्लीच्या IGI विमानतळावर पोहोचले. एअरपोर्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला क्रू परिचय आणि नियामक अनुपालन हेतूंसाठी विमान देशांतर्गत मार्गांवर तैनात केले जाणार आहे. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई येथील प्रवाशांना A350 च्या अतुलनीय आरामदायी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

Indias first Airbus A350
'एअरबस ए-३५०' प्रवाशांच्या सेवेत दाखल

लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी तैनात : एअर इंडियाने एका वर्षापूर्वी दिलेल्या 470 नवीन विमानांच्या ऑर्डरचा एक भाग आहे. हे विमान नंतर लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी तैनात केले जाणार आहे. एअर इंडियाच्या वाढत्या वाइड-बॉडी विमानांच्या ताफ्याला चालना देईल, ज्यामध्ये स्वतःचे आणि अलीकडे कराराने घेतलेल्या विमानांचा समावेश असेल.

हेही वाचा -

  1. इंडिगोची वेबसाईटसह इतर ऑनलाईन सेवा बंद, जाणून घ्या कारण
  2. Indigo Flight Open Emergency Door : इंडिगोच्या विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
  3. Air India offers : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रवाशांसाठी ऑफर; एअर इंडियाची सवलतीच्या दरात प्रवास योजना

Last Updated : Jan 23, 2024, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.