ETV Bharat / state

"त्यांचा क्लीन बोल्ड झालाय...", महायुती मुंबईत षटकार मारणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - INDI alliance clean bowled

INDI alliance clean bowled मुंबईतील सहा जागेवर आमचाच विजय होणार आहे. मुंबईत महायुती षटकार ठोकणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे तीनही उमेदवार उपस्थित होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 7:27 PM IST

मुंबई INDI alliance clean bowled: मुंबईतील शिंदे गटाच्या तीन लोकसभा जागांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही लोकसभा जागांवरील उमेदवार रवींद्र वायकर, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या तिन्ही जागेवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे. या तिन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत. तसंच मुंबईतील सहा जागेवर आमचाच विजय होणार आहे. मुंबईत महायुती षटकार ठोकणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

बैठकीत कशावर चर्चा - मुंबईत तिन्ही जागा धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. पुढील प्रचार आणि काम कसं करायचं याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रणनीती ठरवण्यात आली. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढली जाणार आहे. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. तसंच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या बैठकीला शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर तसंच माजी खासदार संजय निरुपम देखील उपस्थित होते. संजय निरुपम यांचा शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश होणार आहे.

ठाणे, कल्याण, नाशिकमध्ये जोरात काम सुरू - महायुतीत ठाणे, नाशिक या जागांचा तिढा आजपर्यंत सुटला नव्हता. मात्र आज ठाणे इथून नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आम्ही 15 जागांवर निवडणूक लढवत आहोत. ठाणे, कल्याण आणि नाशिक येथे प्रचार जोरात सुरू केलेला आहे. तिथे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणीही जागा जिंकू. तसंच मुंबईतील आमच्या तीन आणि भाजपाच्या तीन मिळून सहाही जागा जिंकू आणि महाराष्ट्रात महायुती जिंकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

त्यांचा क्लीन बोल्ड झालाय... - तुम्ही षटकार मारणार आहे तर विकेट कुणाची जाणार? उद्धव ठाकरेंची विकेट जाणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता, त्यांची ऑलरेडी विकेट गेलेले आहे. ते क्लीनबोर्ड झालेले आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला. लोकांना फील्डवर येऊन काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे. लोकांना विकास हवा आहे. आम्ही घरात बसून काम करत नाही, तर ग्राउंडवर उतरून काम करतो. त्यामुळे आता लोकांना कळलं आहे की, कोण काम करतं आणि कोण काम करत नाही. आमच्या सरकारमध्ये अनेक विकासकामं झाली आहेत हे लोकांना दिसत आहे.

मुंबईत मोदींच्या २ सभा होणार - यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, मुंबई तुम्ही दोन सभा घ्या. त्यांचं मुंबईवर प्रेम आहे. मुंबईतील अनेक विकासकामांना पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे ते आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईत सभा घेतील अशी आशा आहे. तसंच संजय निरुपम यांनी आज सदिच्छा भेट घेतली. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी संजय निरुपम यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मी परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहे आणि जे कोणी शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी जोरात काम आणि जोरदार प्रचार करणार आहे. अनेक वर्षानंतर शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे पुन्हा एकदा मी माझ्या घरात आल्याचा आनंद आणि चांगलं वाटत असल्याचं निरुपम यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा..

  1. मुंबईत शिंदे गटाच्या कमकुवत उमेदवारांमुळं उद्धव ठाकरे गटाला मदत? - LOK SABHA ELECTION 2024
  2. नाशिकमध्ये महायुतीकडून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी - Hemant Godse candidate from Nashik
  3. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.