India vs Zimbabwe : भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताचा पराभव केला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. त्यामुळं आता चौथा सामना कोण जिंकणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलय. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल, तर यजमान झिम्बाब्वे मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून शेवटचा सामना रोमांचक करण्याचा प्रयत्न करेल. झिम्बाब्वे समोर शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय युवा संघाचं तगडं आव्हान असेल.
𝗪𝗵𝗮𝘁 𝗱𝗶𝗱 𝘁𝗵𝗲𝘆 𝗺𝗮𝗸𝗲 𝗼𝗳 𝘁𝗵𝗮𝘁 𝗥𝗮𝘃𝗶 𝗕𝗶𝘀𝗵𝗻𝗼𝗶 𝗰𝗮𝘁𝗰𝗵❓🤔
— BCCI (@BCCI) July 11, 2024
Watch as banter, appreciation, fun & more unfold in this post-match chat! 😎 😎 - By @ameyatilak #TeamIndia | #ZIMvIND | @Avesh_6 | @ShubmanGill | @Sundarwashi5 | @rinkusingh235 pic.twitter.com/fd7QGeFsgy
भारताला मालिका जिंकण्याची संधी : पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव झाला होता. यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव केला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता भारतीय संघाला चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असेल.
#TeamIndia will look to take an unassailable lead in the series when they take on Zimbabwe in the next game. 🇮🇳vs🇿🇼
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 12, 2024
🏏 4th T20I 🗓️ July 13 ⏰ 4:30 PM onwards..
LIVE The Game on DD Sports 1.0 📺 (DD Free Dish)#ZIMvIND #MenInBlue pic.twitter.com/llHDHeesdS
कोणत्या संघाचा वरचष्मा : भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारताने 8 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. हेड टू हेड आकडेवारीत भारतीय संघाचा वरचष्मा आहे. पण झिम्बाब्वेला हलक्यात घेणं खूप महागात पडू शकतं. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताचा पराभव केला. दोन्ही संघांमधील 11 पैकी 10 सामने हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळले गेले आहेत, तर एक सामना मेलबर्न येथे टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळला गेला होता.
🔙 to 🔙 wins in Harare 🙌
— BCCI (@BCCI) July 10, 2024
A 23-run victory in the 3rd T20I as #TeamIndia now lead the series 2⃣-1⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FiBMpdYQbc#ZIMvIND pic.twitter.com/ZXUBq414bI
हरारे स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल : हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात 26 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. हरारेची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही उपयुक्त ठरली आहे. या खेळपट्टीवर भारताने दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात 234 धावा केल्या होत्या. त्यामुळं हा सामनाही हाय स्कोअरिंगचा होऊ शकतो.
Early success with the ball for #TeamIndia! 👏 👏
— BCCI (@BCCI) July 10, 2024
Two wickets for Avesh Khan & a wicket for Khaleel Ahmed 👍 👍
Follow the Match ▶️ https://t.co/FiBMpdYQbc#ZIMvIND pic.twitter.com/wN38Rv6qk8
भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा (जुलै 2024)
- 6 जुलै - पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव
- 7 जुलै - दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 100 धावांनी विजय
- 10 जुलै - तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 23 धावांनी विजय
- 13 जुलै - चौथा टी-20 सामना, हरारे
- 14 जुलै - पाचवा टी-20 सामना, हरारे
Five overs remaining, Zimbabwe are 110/5
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 10, 2024
(Dion Myers 39*, Clive Madande 35*), need 73 runs in 30 balls#ZIMvIND pic.twitter.com/QARD42D0VL
दोन्ही संघ
- भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.
- झिम्बाब्वेचा संघ : सिकंदर रझा (कर्णधार), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा
हेही वाचा
- 22 वर्ष, 401 सामने, 991 विकेट्स; इतिहास रचत वेगवान इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनचा क्रिकेटला 'गुड बाय' - james anderson retired
- भारत-श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक जाहीर; 'गंभीर' युगाला होणार सुरुवात, कधी होणार सामने? - india vs sri lanka series schedule
- भारतातील पहिली महिला अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन; पण भारतात कोणीच विचारलं नाही, पूजा तोमरनं व्यक्त केली खंत - Woman Ultimate Fighter Champion