ETV Bharat / state

'व्हॅलेंटाईन्स डे' सेलिब्रेशन; प्रेमीयुगुलांना पडली युरोपियन केकची भुरळ - युरोपियन केक

Valentines Day 2024 : 'रोझ डे'पासून सुरु झालेला व्हॅलेंटाईन वीक हा 'व्हॅलेटाईन डे'नं समाप्त होतो. आठवडाभर विविध दिवस साजरे केल्यानंतर १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'साठी काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर, कोल्हापुरातील 'युरोपियन केक' तुमच्यासाठी परफेक्ट आहे. सध्या तीन प्रकारातील युरोपियन केक तरुणाईला भुरळ घालत आहेत.

European cake
युरोपियन केक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 9:30 AM IST

युरोपियन केकची व्हॅलेंटाईन डे वाढली मागणी

कोल्हापूर Valentines Day 2024: रोमचे पोप गेलेसियस यांनी 5 व्या शतकात 14 फेब्रुवारी हा दिवस 'सेंट व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं. तुम्ही सुद्धा एखाद्यावर प्रेम करत असाल, तर आणि ते व्यक्त करायचं असेल तर 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमी युगलांसाठी हक्काचा दिवस मानला जातो. या दिवशी हटके सेलिब्रेशन करुन प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळे फंडे तरुण-तरुणींकडून लढवले जातात. या दिवशी केक कापून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. कोल्हापुरातील राजारामपुरीत असणाऱ्या युरोपियन केक यामुळंच मागणी वाढलीय.

युरोपात घेतलं केकचं प्रशिक्षण : कोल्हापुरातील राजारामपुरी 'ओया केक' नावाच्या दुकानात गेली पाच वर्ष प्रथमच युरोपियन केक नावाची संकल्पना व्यावसायिक शोन बडवे यांनी आणली. यासाठी त्यांनी परदेशात जाऊन युरोपियन केक रेसिपीचं स्वतः प्रशिक्षण घेतलं. यानंतर कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी युरोपियन केकचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. काही कारणांनी पुण्यातील दुकान बंद केलं. परंतु आज कोल्हापुरातील राजारामपुरीतील बडवे यांचा वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी नेटानं सुरू ठेवलाय.

कोल्हापुरात रुजवली युरोपियन केकची संकल्पना : वाढदिवस, पार्टी, व्हॅलेंटाईन डे यासह आनंदाच्या क्षणी पारंपरिक पद्धतीचे केक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, क्रीमचे केक सर्वत्रच मिळतात. परंतु यात काहीतरी नवीन करण्याची संकल्पना शोन बडवे यांना सूचली. यासाठी वडील अशोक बडवे यांच्या पाठिंब्यावर त्यांनी थेट युरोप गाठलं. तिथं सात दिवसांचं प्रशिक्षण घेऊन ते कोल्हापुरात आले. त्यांनी युरोपियन केक नावाची संकल्पना कोल्हापुरात रुजवली. जगभरात 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यासाठी प्रेमी युगुल मोठ्या प्रमाणात एकमेकांना केक भरुन हा दिवस साजरा करतात. याच पार्श्वभूमीवर युरोपियन केकला मोठी मागणी वाढलीय. 'चॉकलेट, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी' तसेच राजहंस शेपमधील केक प्रेमी युगुलांना भुरळ घालत असल्याचं, केक व्यावसायिक शोन बडवे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा -

  1. सिंगल आहात? डोंट वरी... असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन्स डे'; जाणून घ्या टिप्स
  2. आला प्रेमाचा दिवस; या 'व्हॅलेंटाईन्स डे'ला तुमच्या पार्टनरला द्या ‘ही’ सहा खास गिफ्टस्
  3. फेब्रुवारीतच 'व्हॅलेंटाईन्स डे' का साजरा केला जातो? 'हा' आहे त्यामागं दडलेला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.