ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी; नागपूर मुंबई विमान तिकिटाचे दर भिडले गगनाला - DEVENDRA FADNAVIS OATH CEREMONY

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. मात्र त्यांच्या शपथविधीला जाण्यासाठी वेळेवर निघालेल्या कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली. विमान कंपन्यांनी तिकिटात भरमसाठ दरवाढ केली.

Devendra Fadnavis Oath Ceremony
नागपूर विमानतळ (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2024, 9:50 AM IST

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्यानं नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातून हजारो देवाभाऊ प्रेमी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघाले. मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते हे समृद्धी महामार्गानं पोहोचले, तर रेल्वेनं देखील कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. मात्र ज्यांनी वेळेवर मुंबईला जाण्याचा प्लॅन केला, त्यांच्या खिशाला तिकीट दरवाढीचा फटका बसला आहे.

नागपूर ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट भाडे वाढले : नागपूर ते मुंबई विमान प्रवासाचे तिकीट भाडे हे साधारणपणे 4 हजार ते 8 हजार एवढे आकारले जाते. मात्र, देवभाऊंच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येतो. गुरुवारी तिकिटांचे दर 10 हजारांच्या घरात गेले. त्यामुळे ज्यांची शपथविधी सोहळ्याला जायची मनोमन इच्छा होती, त्यांना मन मारून नागपुरातचं थांबावं लागलं.

महापरिनिर्वाण दिनामुळे ट्रेन रिझर्व्हेशन फुल्ल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं हजारो अनुयायी 6 डिसेंबर रोजी मुंबईला अभिवादन करण्यासाठी जातात. त्यामुळे 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईला जाण्यासाठी ट्रेनचं रिझर्व्हेशन मिळणं अशक्य आहे. त्यातच देवभाऊंचा शपथविधी होणार असल्यानं केवळ विमान प्रावसाचा पर्याय शिल्लक होता. पण तिकिटांचे दर तिप्पट-चौपट झाल्यानं ते शक्य झालं नसल्याचं मत अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

नागपूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला : राज्यात सरकार स्थापन होत असून, 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबई स्थित आझाद मैदान इथं पार पडला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेल्यानं नागपूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळे देवा भाऊच्या शपथविधी सोहळ्यासाठी समृद्धी महामार्गानं नागपुरातून भाजपा कार्यकर्ते मुंबईत पोहोचले.

प्रत्येक शहरातील भाजप कार्यकर्त्यांना मुंबईचे वेध : महायुती सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी भाजपाच्या वतीनं प्रत्येक शहरातून काही निवडक कार्यकर्त्यांनाच रितसर निमंत्रण देण्यात आलं. नागपुरातून शेकडो हजारो भाजपा कार्यकर्ते "लाडक्या देवा भाऊं"ना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहण्यासाठी नागपुरातून पोहोचले. अनेकांना विमानाचे आणि रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळालं नसल्यानं मुंबई गाठणं कठीण झालं. अशा हजारो कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गानं मुंबई गाठली. नागपुरातून लहान-लहान गटाच्या वाहनांचे काफीले मुंबईला पोहोचले.

हेही वाचा :

  1. राज्यात 'देवेंद्र' पर्वाला सुरुवात; एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
  2. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं
  3. शपथ घेताच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी; 2100 रुपये देणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.