ETV Bharat / state

पुणे शहरात 48 तासात 5 खून; अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश वाढला, नागरिकांमध्ये दहशत - INCREASED CRIME IN PUNE

पुणे शहरात मागील दोन दिवसात खुनाच्या 5 घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मात्र गुन्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश वाढल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

Increased Crime In Pune
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 1:16 PM IST

पुणे : विधानसभा निवडणूक 2024 पार पडल्यानंतर आज राज्यात महायुतीकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच पुण्यात गुन्हेगारांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाला. शहरात मागील दोन दिवसात खुनाच्या 5 घटना घडल्या असून यात अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याचं समोर आहे.

शहरात दोन दिवसात पाच खून : पुणे शहरात मागील दोन दिवसात झालेल्या घटना बघितल्या, तर यात पहिली घटना पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात घडली. गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरुन चार जणांनी 18 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी घटना ही सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री तीन अल्पवयीन तरुणांनी पूर्व वैमन्यस्यातून एका तरुणाचा खून केला. तिसरी घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणावर पूर्व वैमन्यस्यातून कोयत्यानं सपासप वार करण्यात आले. रामटेकडीतील परिसरात मंगळवारी ही घटना घडली. या घटनेत 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेला तरुण बारावीत शिकत होता. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

लोहगाव रस्त्यावर युवकाचा खून : वाघोली लोहगाव रस्त्यावरील अभिलाषा सोसायटी समोर बुधवारी राजू लोहार (वय ४८) या व्यक्तीचा खून करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलं. अल्पवयीन आरोपी आणि मृत राजू लोहार दोघं दारू पीत बसले होते. दारू पीताना राजू लोहार यानं आरोपीला उद्देशून "तुझा बाप टकल्या आहे," असा शब्द वापरला. यावरुन दोघात भांडण झालं आणि आरोपीनं जवळ पडलेला दगड उचलून आरोपीला मारला. गंभीर जखमी झालेल्या राजू लोहार याचा जागीच मृत्यू झाला. पाचवी घटना ही पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉग घालून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

शहरातील गुन्हेगारीनं काढलं डोकं वर : पुणे शहरात मागील दोन दिवसात या 5 खुनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला आहे. नुकतीच विधानसभा निवडणूक 2024 पार पडली आहे. त्यातच आता शहरातील गुन्हेगारीनं डोकं वर काढलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यात अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

  1. लिव्ह इन पार्टनरची हत्या करून दिली हरविल्याची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा 'असा' लावला छडा
  2. दारूच्या नशेत मित्राचा मारहाणीत मृत्यू, दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, दिंडोरी तालुक्यातील घटना
  3. तिहेरी हत्याकांडानं हादरली दिल्ली : पती पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सकाळी फिरायला गेल्यानं मुलगा बचावला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.