ETV Bharat / state

हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी : अमोल बालवडकर संतापले

हिंद केसरी अभिजित कटके यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. मात्र या छापेमारीवरुन भाजपा नेते अमोल बालवडकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

Income Tax Raid On Hind Kesari
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2024, 2:11 PM IST

पुणे : आज सकाळी पुण्यातील वाघोली इथल्या कटकेवाडीतील हिंद केसरी अभिजीत कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली असून तपास सुरू आहे. त्यामुळे भाजपाचे नेते अमोल बालवडकर या प्रकरणी आक्रमक झाले. माझा मेव्हणा आहे म्हणून चुकीचा व्यवसाय नसताना देखील त्यांच्या घरावर धाड पडली आहे का, असा सवाल यावेळी अमोल बालवडकर यांनी केला आहे.

अभिजित कटके यांच्या घरी छापेमारी : पुण्यातील वाघोली इथले अभिजित कटके यांच्या वाघोली आणि परिसरातील 15 जमीन विकासकांच्या कार्यालयात आणि घरी आयकर विभागानं पहाटे पाच वाजता छापेमारी केली. या ठिकाणी अजूनही तपासणी सुरू आहे. अभिजित कटके हे पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचे पैलवान असून त्यांनी एकवेळ महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर हिंद केसरीचा किताब पटकावला आहे.

भाजपाचे अमोल बालवडकर संतापले : आयकर विभागानं छापेमारी केल्यामुळे भाजपाचे नेते अमोल बालवडकर म्हणाले की, "आज सकाळी माझे मेहुणे हिंद केसरी अभिजीत कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्सची छापेमारी झाली आहे. देशाचं नाव ज्यानं उंचावलं त्यांच्या घरी छापा पडणं ही आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यांचे अवैध व्यवसाय नसताना देखील त्यांच्या घरावर छापेमारी झाली आहे. तो माझा मेव्हणा आहे म्हणून त्याच्या घरावर धाड पडली का असा मला प्रश्न पडतोय," असं यावेळी बालवडकर म्हणाले.

भाजपामध्ये चंद्रकांत पाटील आणि बालवडकर वाद : विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघातून आमदारकीसाठी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून बालवडकर आणि पाटील यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. अमोल बालवडकर हे आक्रमक भूमिका घेत कोथरूडमध्ये निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून पहिल्या यादीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आल्यानं बालवडकर हे नाराज झाले. ते बंड करणार असल्याची चर्चा सुरू असून आता पैलवान अभिजित कटके यांच्यावर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमुळे कोथरूड मतदार संघातील राजकारण तापलं आहे.

हेही वाचा :

  1. चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; थेट देवेंद्र फडणवीसांकडं तक्रार - Chandrakant Patil
  2. विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच विरोध; 'या' नेत्यानं दिलं आव्हान - Kothrud Assembly Election 2024
  3. कोथरूड मतदारसंघात अमोल बालवडकर यांचं मोठं शक्तिप्रदर्शन; नागरिकांना दिला प्रमुख पाहुण्याचा मान - Amol Balwadkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.