नाशिक Crack Fell In Kasara Ghat : इगतपुरी परिसरात पावसामुळं कसारा घाटात रुळावर दरड कोसळली. पंचवटी एक्स्प्रेस गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडल्यानं मोठा अपघात टळला, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ढिगारा हटवण्याचं काम सुरू : इगतपुरी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडल्यानं वाहतूक कोंडी होत असून या प्रवासासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळं मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत आहेत. मात्र, आज मुसळधार पावसामुळं इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात पूल नंबर 129/9 ते 130/1 या भागात दरड कोसळी. दरड कोसळण्यापूर्वी मनमाड-मुंबई-पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून गेली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. दरड कोसळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुळावर पडलेले मोठे दगड, माती काढण्याचं काम सुरू केलं.
रेल्वे मार्गावर मातीचा ढीग जामा झाला आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कसारा घाटात एकूण तीन रेल्वे मार्ग आहेत. उर्वरित दोन मार्गांवर परिणाम झालेला नाही. नाशिकहून मुंबईकडं जाणाऱ्या गाड्या घाटाच्या मधल्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रेल्वेचं पथक मातीचा ढीग काढण्याचं काम करत आहे. रेल्वे मार्गाला काही नुकसान झालं का, याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. - रेल्वे अधिकारी
रेल्वेची वाहतूक सुरळीत : घटनेनंतर मुंबईकडं जाणाऱ्या काही गाड्या मनमाड, नाशिक रोड, देवळाली, लहवित स्थानकावर थांबण्यात आल्या होत्या. कसारा घाट क्षेत्रात तीन रेल्वे ट्रॅक असल्यानं इतर दोन रेल्वे ट्रॅकवरून रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यामुळं मुंबईकडं जाणाऱ्या अनेक गाड्या एक-दोन तास उशिरानं धावत आहेत. दरड काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून पुढील दोन तासात मार्ग सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनांनं सांगितलं.
'हे' वाचलंत का :
- मध्य रेल्वेच्या मार्ग विस्ताराला अतिक्रमणाचा 'ब्रेक', रेल्वे प्रशासनानं सरकारकडं 'ही' केली मागणी - Railway Extension Project
- काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains
- पुणतांबा रेल्वे स्थानक 'जंक्शन' असूनही रेल्वेला थांबा नाही; स्वातंत्र्यदिनी 'रेल्वे रोको' आंदोलनाचा दिला इशारा - Puntamba Junction