ETV Bharat / state

आदर्श बँक घोटाळा प्रकरण : ठेवीदारांच्या पैशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवणार, इम्तियाज जलील यांचा इशारा - Imtiyaz Jaleel Warns Eknath Shinde

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 8:00 AM IST

Updated : Aug 2, 2024, 9:34 AM IST

Imtiyaz Jaleel Warns Eknath Shinde : आदर्श बँकेतील घोटाळ्यावरुन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. आदर्श घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ द्यावा, अन्यथा त्यांच्या लाडक्या बहिणी आणि ठेवीदार त्यांचं कुठं कुठं स्वागत करतील, पाहा, असा गर्भित इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

Imtiyaz Jaleel Warns Eknath Shinde
माजी खासदार इम्तियाज जलील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी (Reporter)
माजी खासदार इम्तियाज जलील (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Imtiyaz Jaleel Warns Eknath Shinde : आदर्श नागरी पत संस्थेत गोरगरिबांचे पैसे अडकले आहेत. त्याबाबत योग्य निर्णय घेऊन न्याय देऊ, असं आश्वासन देऊन दहा महिने झाले, तरी अद्याप न्याय मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारच्या दौऱ्यात आम्हाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, असं न झाल्यास आम्ही आंदोलन करणार, असा इशारा एम आय एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात याबाबतचा जाब विचारणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

आदर्श ठेवीदारांसाठी आंदोलन : आदर्श नागरी सहकारी बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा परतावा मिळावा, यासाठी गेल्या वर्षभरापासून मागणी होत आहे. हजारो नागरिकांनी कोट्यवधी रुपये बँकेत गुंतवले आहेत. मात्र अचानक अनियमितता आढळून आल्यानं आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले. ठेवीदार रस्त्यावर उतरले, लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी करण्यात आली. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आंदोलनात सहभाग घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक मोठं आंदोलन देखील केलं होतं. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला. लोकसभा निवडणूक असल्यानं मुद्दा मागं पडला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी पुन्हा एकदा ठेवीदारांचे पैसे परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारलं जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय.

न्याय मिळत नसल्याने आंदोलन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत आदर्श प्रकरणात अडकलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची हमी दिली. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. परंतु आजतागायत त्याची पूर्तता करण्यात आली नाही. 2 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांची वेळ मागण्यात आली असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. आदर्श ठेवीदारांना चर्चेसाठी वेळ देण्यास असमर्थता दर्शवल्यास लोकशाही मार्गानं कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्यात येणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केलं. "रितसर पोलिसांना निवेदन दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, आत 10 महिने झाले असून, आमच्या समस्यांची आठवण करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहे. लाडक्या बहिणीला फुकट का पैसे देत आहेत, निवडणुकीत आम्हाला मतदान करण्यासाठी हे पैसे दिले जात आहेत. उद्या आम्हाला वेळ दिली नाही, तर सिल्लोडला जाताना त्यांच्या लाडक्या बहिणी आणि ठेवीदार कुठं कुठं स्वागत करतील पाहा," असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय.

हेही वाचा :

  1. Adarsh Bank 200 Crore Scam: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील काढणार ग्राहकांसाठी काढणार निषेध मोर्चा
  2. खासदार इम्तियाज जलीलसह ठेवीदार घुसले विभागीय आयुक्तालयात, पोलिसांनी फोडले अश्रू धुळ्याचे नळकांडे
  3. Imtiaz Jaleel On Patsanstha : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा; खातेदारांना घेऊन खासदार जलील यांचा मोर्चा

Last Updated : Aug 2, 2024, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.