ETV Bharat / state

मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert - IMD ISSUES ORANGE ALERT

IMD Issues Orange Alert : मुंबईत मागील आठवड्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. आता पुन्हा भारतीय हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला. तर ठाण्यालाही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD Issues Orange Alert
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 9:41 AM IST

मुंबई IMD Issues Orange Alert : मायानगरी मुंबईत मागच्या आठवड्यात पावसानं हाहाकार उडवल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. आता पुन्हा भारतीय हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला. तर ठाण्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सूनचा जोर अरबी समुद्रात वाढला असून त्यामुळे वारे जोरात वाहत असल्याचंही भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं.

मुंबईला ऑरेंज तर ठाण्याला येलो अलर्ट : भारतीय हवामानशास्त्र विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर ठाण्याला भारतीय हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी आणि शनिवारी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, काम असेल तरच घराबाहरे पडावं, असं स्पष्ट केलं.

पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता : भारतीय हवामान विभागानं आज सकाळपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सखल भागात जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागानं केलं आहे.

मुंबईत पुढील तीन ते चार तासात मुसळधार पाऊस : मुंबईला भारतीय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून शहरात मुसळदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुढीलतीन ते चार तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असंही भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळं नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा :

  1. मुसळधार पावसाचा दणका; रेल्वे वाहतूक विस्कळीत, तब्बल 50 विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांना मनस्ताप - Heavy Rain In Mumbai
  2. मुंबईत पावसाची विश्रांती मात्र रेड अलर्ट कायम; जाणून घ्या लोकलचे अपडेट काय? - Mumbai Rain
  3. नाव मोठं लक्षण खोटं! आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पावसाळ्यात देऊ शकत नाही मुलभूत सुविधा - Mumbai Rain

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.