मुंबई/पुणे Maharashtra Rain Update : मागील पाच-सहा दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. शनिवारी मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरसह कोकणात देखील मुसळधार पाऊस पडला. यानंतर पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. तर दुसरीकडं (Khadakwasla Dam News Today) पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकता नगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं (Pune Flood Situation Today) आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Water entered the basement parking of Dwarka building in Ekta Nagar as the water level rose in the Mutha River. Army Personnel and the Pune Fire Brigade present at the spot. pic.twitter.com/bv8hhwhcu7
— ANI (@ANI) August 4, 2024
खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडलं : पुणे आणि खडकवासला परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एकता नगर परिसरात भारतीय सैन्याची तुकडी तैनात करण्यात आली. या भागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह फाय ब्रिगेडचे मिळून सुमारे 100 कर्मचारी तैनात आहेत.
#WATCH | Maharashtra | People gathered at Mumbai's Marine Drive to witness high tide.
— ANI (@ANI) August 4, 2024
IMD has also issued an orange alert for Mumbai today. Heavy rain in the city and suburbs with the possibility of very heavy rainfall at isolated places with occasional gusty winds reaching 65… pic.twitter.com/WsOXTik85y
ऑरेंज अलर्ट कुठे? : राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे, याबाबत हवामान खात्याकडून राज्यातील विविध जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' आणि 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं 'ऑरेंज अलर्ट' जारी केला. दुसरीकडं नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील हवामान खात्यानं 'ऑरेंज अलर्ट' दिला. दरम्यान, मागील आठवड्यात मुंबईत अतिवृष्टी झाली होती. यामुळं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. तर मुंबईत सखल भागात पाणी तुंबलं होतं. याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्त्यावरील वाहतुकीवर झाला होता. यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
#WATCH | Maharashtra: Water level of Mutha River rises due to incessant rainfall in parts of Pune pic.twitter.com/kRttFpnpN1
— ANI (@ANI) August 4, 2024
रेड अलर्ट कुठे? : घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. इथे अतिवृष्टी होऊ शकते तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा 'रेड अलर्ट' हवामान खात्यानं दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पावसानं समाधानकारक हजेरी लावली आहे. शेतीची कामंही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तसेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 60 टक्क्यांच्यावर साठला आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामानतज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे, तिथे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत.
हेही वाचा -
- राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods
- पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी; पाहा व्हिडिओ - Pune rain updates
- पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates