ETV Bharat / state

पूजा खेडकर अजूनही 'नॉट रिचेबल'; चौकशीला राहिल्या गैरहजर, कारवाई होण्याची शक्यता - IAS Pooja Khedkar Case - IAS POOJA KHEDKAR CASE

IAS Pooja Khedkar Case : बनावट प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. गेल्या काही दिवस नॉट रिचेबल असलेल्या पूजा खेडकर यांना चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं. मात्र, त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या आहेत.

Pooja Khedkar
पूजा खेडकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 4:47 PM IST

पुणे IAS Pooja Khedkar Case : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी यूपीएससीला बनावट मेडिकल सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांचं राज्यातील प्रशिक्षण रद्द करण्यात आलं आणि पूजा खेडकर यांना पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्याआधी त्या नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चौकशीची मुदत संपून देखील त्या मसुरी येथे गेल्या नाहीत. चौकशीसाठी मसुरीला न गेल्यानं आता पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

चौकशीला राहिल्या गैरहजर : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबतची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच पूजा खेडकर यांना चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर या चौकशीला देखील गेल्या नाहीत आणि त्यांच फोन देखील नॉट रीचेबल दाखवत आहे. तसेच पुणे पोलिसांकडून नोटीस देऊनही चौकशीला खेडकर या गैरहजर राहिल्या. पूजा खेडकर यांना मसुरीत ट्रेनिंग सेंटरने 23 जुलैपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत त्या पोहचल्या नसल्यानं आता खेडकर यांच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.

आणखी धक्कादायक माहिती : पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत एकामागून एक अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुरूवातीला दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहावेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग वारेमाप संपत्ती असताना नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर केलं, अशी माहिती समोर आलीय.

हेही वाचा -

  1. पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? आयएएस पदावरून काढण्याकरिता 'हे' आहेत नियम - IAS POOJA KHEDKAR CASE
  2. "पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिले दोन पत्ते; मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा" - Vijay Kumbhar on Pooja Khedkar
  3. पूजा खेडकर पोहोचल्याच नाही मसुरीला; विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, 'ही' केली मागणी - Vijay Kumbhar on Pooja Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.