ETV Bharat / state

पूजा खेडकरच्या फरार कुटुंबाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू, पंतप्रधान कार्यालयानं सविस्तर मागिवला अहवाल - IAS Pooja Khedkar Family Absconded - IAS POOJA KHEDKAR FAMILY ABSCONDED

IAS Pooja Khedkar Family Absconded : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीतील वाढ काही कमी होताना दिसत नाही. आता त्यांच्या घरातील इतर सदस्यांवरही विविध आरोप होत आहेत. पुणे पोलीस खेडकर कुटुंबा

IAS Pooja Khedkar Family Absconded Pune Police are searching
पूजा खेडकरचे पालक फरार, पुणे पोलिसांकडून शोध सुरू (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 2:19 PM IST

पुणे IAS Pooja Khedkar Family Absconded : ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच मुळशीतील एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याच गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस खेडकर कुटुंबीयांशी संपर्क साधत होते. मात्र, खेडकर कुटुंब फरार झाल्याचं समोर आलंय.

पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

मनोरमा खेडकर यांचा फोन स्विचऑफ : आज (15 जुलै) पुणे ग्रामीण पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांच्या पुण्यातील निवासस्थानी जात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांच्या घराचा गेट बंद होता. तसंच आतमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं पोलिसांना माघारी जावं लागलं. यावेळी माध्यमांशी संवाद पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर म्हणाले की, " मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी काल आणि आज आमचे कर्मचारी आले होते. मात्र, त्या घरी नव्हत्या. त्यामुळं मनोरमा खेडकर यांच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोनही स्विचऑफ लागतोय. तसंच आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचा शोध लागल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे."

पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये त्या एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावत असल्याचं दिसत होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह (रा.नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), दिलीप खेडकर (रा. नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), अंबादास खेडकर (रा. आंबी ता हवेली पुणे) त्यांच्या सोबत आलेल्या काळ्या कपड्यांमधील अनोळखी दोन पुरूष, दोन महिला आणि इतर गुंड लोक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (रा. मु पो केडगाव, आंबेगाव पुनवर्सन ता. दौड जि.पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आ

  • पूजा खेडकर आता चारही बाजूनं अडचणीत आल्या आहेत. केंद्र सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांची निवड करणारी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीकडूनदेखील त्यांची चौकशी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.

हेही वाचा -

  1. "...तर मुलीला मी राजीनामा द्यायला सांगेन", आयएएस पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचं मोठं वक्तव्य - IAS Pooja Khedkar controversy
  2. "आयएएस अधिकारी पूजा खेडकर..." ; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Pooja Khedkar Case
  3. पूजा खेडकरांमागे 'दिवे' लावल्यानं शुक्लकाष्ठ; आरटीओ, पोलिसांसह पुणे महानगरपालिकेनं 'या' कारणांनी बजाविली नोटीस - IAS Pooja Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.