ETV Bharat / state

पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी होणार सील ; पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर - IAS Pooja Khedkar Controversy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 12:34 PM IST

Updated : Jul 19, 2024, 3:27 PM IST

IAS Pooja Khedkar Controversy : वादग्रस्त आयआएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी पिंपरी चिंचवड कंपनीचा पत्ता दिला होता. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिका अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

IAS Pooja Khedkar Controversy
आयएएस अधिकारी पूजा खेडकर (ETV Bharat)

पुणे IAS Pooja Khedkar Controversy : वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून खेडकरांच्या कंपनीवर लवकरच हातोडा पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याच अनुषंगानं पिंपरी महापालिकेकडून कारवाईला सुरुवात होणार आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून पूजा खेडकर हे प्रकरण राज्यासह देशभरामध्ये गाजत आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढं आल्यानं त्यांची चौकशी होत आहे. त्यामुळे त्यांचा प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आलेला आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिका लवकरच त्यांच्याशी संबंधित कपंनीवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

प्रदीप जांभळे पाटील यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reportre)

पूजा खेडकर यांच्याशी संबंधित कंपनी होणार सील : पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या आई-वडिलांचे गैरप्रकार उघड होत आहेत. जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले. त्यांना गुरुवारी पोलिसांनी महाड इथल्या हॉटेलमधून अटक केलं. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढताना जो पत्ता दिला, त्या पत्त्यावर त्यांच्या आईची कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी महानगरपालिकेच्या रडावर असून कंपनी सील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

IAS Pooja Khedkar Controversy
थकबाकी पत्र (Reporter)

कंपनीनं बुडवला पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबा नगर, तळवडे इथं असलेली थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता वादात सापडली आहे. थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2 लाख 77 हजार इतका कर मागील दोन वर्षापासून बुडवला आहे. तसंच थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खेडकर कुटुंबीयांनी रेड झोनमध्ये उभारली असल्यानं खेडकर कुटुंबीयांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिला या कंपनीचा पत्ता : पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं आहे. हे दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी पूजा खेडकर यांनी याच कंपनीचा पत्ता दिला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका खेडकर कुटुंबीयांच्या कर थकवणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याची शक्यता आहे. तसंच "ही कंपनी रेड झोनमध्ये उभारली असल्यानं या कंपनीवर पिंपरी चिंचवड महापालिका हातोडाही चालवू शकते," अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. पूजा खेडकर यांच्याविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक; दमदाटी केल्याचा आरोप, "कारवाई करा अन्यथा..." - IAS Pooja Khedkar Controversy
  2. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना पाचाड येथील लॉजिंगमधून पहाटे अटक, पाहा सीसीटीव्ही फुटेज - Manorama Khedkar arrested
  3. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा? खोटा पत्ता देऊन रेशनकार्ड मिळविल्याचा दावा - IAS Pooja Khedkar

Last Updated : Jul 19, 2024, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.