शिर्डी Sai Sansthan : हैदराबाद येथील एका साईभक्त परिवाराकडून साई चरणी तब्बल तीन किलो चांदीच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या. यात एक ग्लास, ताट, मुकुट असे तब्बल तीन लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू साई संस्थानकडे साईभक्त परिवारानं सुपूर्द केल्या.
तीन लाखांच्या वस्तू : हैदराबाद येथील डॉ हरिनाथ रेड्डी हे साईबाबांचे निस्सीम भक्त असून, ते 1981 साल पासुन साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहेत. डॉ हरिनाथ रेड्डी यांची मुलगी सौम्या हिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साईबाबांना चांदीची काही तरी वस्तू अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार अखेर या साईभक्त परिवारानं शिर्डीत येत एक ग्लास, ताट, मुकुट अशा तब्बल तीन किलो चांदीच्या वस्तू साई संस्थानला भेट स्वरुपात दिल्या. या वस्तूंची किंमत 3 लाख रुपये असल्याचं भाविकांकडून सांगण्यात आलंय.
संस्थानकडून साईभक्ताचा सत्कार : यावेळी चांदीचा ग्लास आणि ताट या वस्तू साईबाबांच्या मंदिरात वापरण्यात याव्या तसंच गावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरातील मारुतीला मुकुट चढवण्यात यावा अशी इच्छा देणगीदार साईभक्त रेड्डी यांनी व्यक्त केली. दरम्यान रेड्डी साईभक्त परिवारानं या सर्व वस्तू आज साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपुत्र केल्या आहेत. यावेळी साई संस्थानचा वतीनं रेड्डी साईभक्त परिवाराचा साईबाबांची मूर्ती तसंच शॉल देवून सत्कार करण्यात आला.
जानेवारीतही आलं होतं असंच दान : याप्रमाणे जानेवारी 2024 मध्ये देखील बेंगळुरु येथील एका साई भक्तानं साईबाबांना अर्धा किलो वजनाचा आणि 29 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला होता. 504 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा मुकुट सुंदर कोरलेला होता. तो दिसायला खूप आकर्षक होता. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना दररोज लाखोंच्या देणग्या मिळतात. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते.
हेही वाचा :