ETV Bharat / state

मूकबधिर तरुणाची हत्या का केली? खोटे सांगून आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल, तपासात आला नवा ट्विस्ट - HUSBAND MURDER CASE MUMBAI - HUSBAND MURDER CASE MUMBAI

Husband Murder Case Mumbai : रेल्वेतून सुटकेसमध्ये मृतदेह आढळलेल्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पोलिसांनी खून झालेल्या मूकबधिर तरुणाच्या पत्नीला अटक केली आहे.

Husband Murder Case Mumbai
पतीच्या हत्येतील अटक आरोपी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 5:50 PM IST

Updated : Aug 8, 2024, 6:34 PM IST

मुंबई Husband Murder Case Mumbai : पत्नीनं विवाहबाह्य संबंधातून मूकबधिर पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना दादरमध्ये सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहावरून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती.

मृत अर्शद शेख, जय आणि शिवजीत हे तिन्ही आरोपी मूकबधिर आहेत. अर्शदच्या हत्येचा कट हा त्याची पत्नी रुकसाना हिनेच रचल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला म्हणजेच मृत अर्शदच्या पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांनी दिली.

आरोपी जय उच्चशिक्षित कुटुंबातील : हर्षदचा 2012 मध्ये रुकसानासोबत निकाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. रुकसानादेखील मुकी आहे. अर्शद छोटी मोठी कामं करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. पायधुनी येथील गुलालवाडी परिसरात कोट्यवधीच्या घरात राहणारा जय चावडा आणि शिवजीत सिंग यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जात असताना अर्शदची मैत्री झाली होती. जय हा अंधेरीतील एका कंपनीत ॲनिमेशनचे काम करतो. त्याची आई आणि भाऊ कॅनडामध्ये राहतात. दर रविवारी जयच्या घरी येऊन अर्शद आणि शिवजीत दारूची पार्टी करायचे.

दारू पार्टीसाठी अर्शदला फोन : शिवजीत हा बेरोजगार आहे. जय आणि रुकसाना या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते. या संबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या अर्शदचा खून करण्याचा कट जय आणि रुकसाना या दोघांनी आखला. त्याप्रमाणे रविवारी दारू पार्टी दरम्यान अर्शदला फोन करण्यात आला. यानुसार कुर्ल्यात राहणाऱ्या मूकबधिर अर्शद अली सादिक अली शेख याची रविवारी (4 ऑगस्ट) कीका स्ट्रीटवर असलेल्या जय चावडा याच्या घरी दारू पार्टी दरम्यान हत्या करण्यात आली होती.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आखला प्लान : आरोपींनी एका मोठ्या सुटकेसमध्ये अर्शदचा मृतदेह भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्लान आखला. यानंतर तो रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेसने प्रवास करत असताना आरपीएफ आणि जीआरपीनं जय चावडाला अटक केली. यानंतर पळून गेलेल्या शिवजित सिंगलादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी मूकबधिर असल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. अटकेनंतर जयनं शिवजीतवर सर्व आरोप ढकलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला दिलेल्या जबाबात जयनं पोलिसांना खोटी माहिती दिली होती.

हेही वाचा :

  1. Vasai Murder : पत्नीनेच काढला पतीचा काटा; पतीच्या हत्येची दिली 1 लाखात सुपारी
  2. Satara Crime : अनैतिक संबंधातून विवाहित तरूणाची हत्या; शेतात पुरला मृतदेह, पत्नीसह एक ताब्यात
  3. अनैतिक संबंधाच्या संशयातून भाजी विक्रेत्याची तलवारीचे वारकरून हत्या, चौघांना अटक

Last Updated : Aug 8, 2024, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.