ठाणे Husband Killed His Wife : चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्यानं बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील भादवड गावात निर्जनस्थळी असलेल्या शेतातील विहिरीनजीक घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर माळ रानात रात्रीची भीती वाटत असल्याचं सागंत 'तो' बायकोला सोबत घेऊन गेला. तिथच नवऱ्यांनं तिचा ओढणीनं गळा आवळून हत्या केली. तसंच तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहे.
ओढणीच्या सहाय्यानं पत्नीची गळा आवळून हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मूळची बिहार राज्यातील नरहन स्टेट पक्कीवाद गावाची होती. लग्नानंतर नवऱ्यासोबत भिवंडीतील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील चाळीत राहत होती. त्यांना एक 12 वर्षाचा मुलगा तसंच 13 वर्षाची मुलगी आहे. त्यातच आरोपी नवरा बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळं या दोघांमध्ये वादही होते. त्यानंतर 27 जून रोजी बायकोचा काटा काढण्याचं ठरवून त्यानं बायकोला घरापासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या शेतातील विहिरीजवळ नेलं. त्या ठिकाणी त्यानं ओढणीच्या सहाय्यानं पत्नीची गळा आवळून हत्या केली.
बायकोचा मृतदेह विहिरीत फेकला : त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी नवऱ्यानं बायकोचा मृतदेह भादवड गावातील शेतातील वापरात नसलेल्या विहिरीत फेकून दिला. बायकोची हत्या केल्यानंतर मृतकाची बहीण,आई, भावाची दिशाभूल करण्यासाठी आरोपीनं पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याचं सांगितलं. तसंच आरोपी नवऱ्यानं शांतीनगर पोलीस ठाण्यात 30 जून रोजी बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र 2 जुलै रोजी विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना एका मुलाला दिसल्यानं गुन्ह्याला वेगळ वळण लागलं.
आरोपीला पोलीस कोठडी : घटनेची माहिती पोलीस मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करीत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात नवऱ्यावर संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं अधिक चौकशी केली. तेव्हा त्यानं बायकेचा मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली दिली, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतकची बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कलम 103(1), 238 नुसार गुन्हा दाखल केलाय. आज 5 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे वचालंत का :