ETV Bharat / state

निवडणुकीच्या दिवशी आई कशी...; रोहित पवारांनी साधला अजित पवारांवर निशाणा - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Rohit Pawar criticizes Ajit Pawar: निवडणुकीच्या दिवशी अजित पवारांना आईची आठवण कशी आली? असा टोला आमदार रोहित पवार यांची यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Rohit Pawar
आमदार रोहित पवार (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 5:42 PM IST

रोहित पवार पत्रकार परिषद (Reporter ETV Bharat Maharashtra)

पुणे Rohit Pawar criticizes Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा आरोप केलाय. तसंच रोहित पवार यांनी 'X'वर अकाऊंटवर काही व्हिडिओ शेअर केल्यानं त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या आई आशा पवार यांनी मतदान केलं. तसंच माझी आई माझ्यासोबत असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. त्यावर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. " काहींना मतदानाच्या दिवशीच आईची आठवण येत?", असा सवाल रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

काय म्हणाले रोहित पवार? : “आमचे सर्व कार्यकर्ते, अधिकारी मतदार संघात बूथ कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी चर्चा करून काही अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 155 संवेदनशील मतदारसंघ असल्याचं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलंय. आतापर्यंत आमच्याकडं पैसे वाटपाच्या 18 तक्रारी आल्या आहेत. मारहाण, गैरवर्तनाचा प्रयत्न केल्याच्या 8 तक्रारी आहेत. यातील सर्वाधिक तक्रारी बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत. म्हणजे अजित पवार फक्त बारामतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

तसंच त्यांनी दत्तात्रय भरणे यांचा वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. “भरणे यांची भाषा असंवैधानिक आहे. त्यांनी कार्यकर्त्यांविरुद्ध जी भाषा वापरली त्याला गुंडगिरी म्हणतात. सत्तेत राहून त्यांची अशी दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही या संदर्भात तक्रार दाखल केली आहे",, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी मतदान झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी भेट दिली. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सुप्रिया सुळे काकूंना भेटायला गेल्या होत्या. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी काकींची काहीही चूक नाही. सुप्रिया सुळेंनी राजकीय संस्कृती जपली आहे', असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय.

हे वाचलंत का :

  1. पालघर लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलणार, खासदार राजेंद्र गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Rajendra Gavit join BJP
  2. शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Dattatray Bharane Viral Video
  3. बारामतीत रंगलं 'माँ का आशीर्वाद' नाट्य, देवेंद्र फडणवीसांनीही दिलं प्रोत्साहन - Loksabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.