ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं 6 जणांचा मृत्यू, 1500 घरांची पडझड - Nashik Unseasonal Rain

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 9:57 PM IST

Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक घरांची पडझड झाली असून गेल्या तीन महिन्यात 6 व्यक्तींचा वीज पडल्यामुळं आणि भिंत कोसळल्यामुळं मृत्यू झाला आहे.

Unseasonal Rain
अवकाळी पाऊस (ETV BHARAT MH DESK)

नाशिक Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं झोडपून काढलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत गेल्या तीन महिन्यात 6 व्यक्तींचा वीज पडल्यामुळं आणि भिंत कोसळल्यामुळं मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1500 होऊन अधिक घरांचं नुकसान झालं असून 490 पशु मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हा प्रशासनाला पंचनामे केल्यानंतर भरपाईसाठी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

475 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. काही भागात महिलांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. अशात पाणी विकत घेऊन जगावलेल्या गुरांना मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसला आहे. आतापर्यंत 13 म्हशी, नऊ बैल, पाच शेळ्या आणि तब्बल 475 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झालाय. गेल्या दोन दिवसापासून देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा होत असल्यानं अनेक घरांची छपरे उडाली आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडली आहे तर मेंढ्या, शेळ्या आणि गुरेही मृत्यू पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

6 जणांचा मृत्यू : वीज पडून निफाड येथील बापू वैद्य, दिंडोरी येथील फुलाबाई चौधरी, त्र्यंबकेश्वर येथील नामदेव बोरसे, देवळा भागातील आकाश देवरे, नांदगांव येथील विलास गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. तर देवळा येथील देविदास अहिरे यांचा शेडची भिंत कोसळल्यानं मृत्यू झाला आहे.

वारसांना चार लाखांची मदत : नैसर्गिक आपत्तीमुळं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाखाची आर्थिक मदत केली जाते. दिंडोरी येथील एका व्यक्तीला ही मदत मिळाली तर दोन प्रस्ताव मंजूर झाले असून, येत्या काही दिवसात त्यांना आर्थिक मदत मिळेल. पशुधनाच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्यांचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. मराठवाड्यासह वऱ्हाडात अवकाळी पावसाची हजेरी; झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही खंडीत - Unseasonal Rain
  2. अवकाळी पाऊस, धुळीच्या वादळानं 'मायानगरी' आणि ठाण्यात हाहाकार, भर दुपारी दाटला अंधार; नागरिकांची तारांबळ - Rain in Mumbai
  3. राज्यातील १९ जिल्ह्यात आज यलो अलर्ट, नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज - Maharashtra weather update

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.