ETV Bharat / state

काय सांगता! मांसाहारी लोणचं बाजारात, इंद्रप्रीत नागपाल यांचा खास बँन्ड; पाहा 'चवदार' रिपोर्ट

Non veg pickles : आजपर्यंत आपण लिंबू, आंबा, मिर्ची यापासून बनवलेले लोणचं खाल्ल असेल. मात्रस, आता मुंबई उपनगरातील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या होम शेफ इंद्रप्रीत नागपाल यांनी नॉनव्हेज लोणच्याचा ब्रँन्ड फेमस केला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 11:01 PM IST

Updated : Mar 8, 2024, 11:08 PM IST

होम शेफ इंद्रप्रीत नागपाल
होम शेफ इंद्रप्रीत नागपाल
मांसाहारी लोणचं बाजारात

मुंबई Non veg pickles : आपल्या देशात लोणच्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. त्यामुळे आपल्याकडे बाजारात ऋतूनुसार उपलब्ध होणाऱ्या फळं आणि भाज्यांपासून चटपटीत लोणची तयार केली जातात. बाजारात अनेक प्रकारची लोणची उपलब्ध आहेत. गाजर, लिंबू, मिरची, लसूण आंबे, आलं, आवळा या प्रकारची लोणची बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी चिकन, मटण, प्रॉनपासून बनवलेले लोणचं खाल्लं का? मुंबईमधील इंद्रप्रीत नागपाल यांनी हे नॉनव्हेज लोणचं तयार केलं आहे. घरगुती लोणचं तयार करत त्यांनी अल्पावधीतच आपला ब्रॅन्ड विकसित केला आहे.

जैम आणि सॉस देखील तयार केले : मुंबई उपनगरातील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या होम शेफ इंद्रप्रीत नागपाल यांना लोक रमी नावाने देखील ओळखतात. त्यांचे पती गुरुप्रीत सिंग खाजगी कंपनीत नोकरीला असून, त्यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव तनिष्का तर दुसरीच नाव मेहर असं आहे. तनिष्का जाहिरात क्षेत्रात काम करतं तर वेडिंग प्लॅनरमध्ये जॉब करते. याचा फायदा इंद्रप्रीत यांना आपल्या प्रॉडक्टचा ब्रँडिंग करण्यास फायदा होतो. त्यांनी (Herbs n spices)नावाने आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. त्यांनी लोणच्याचे 100 पेक्षा जास्त प्रकार तयार केले असून, त्यासोबत जैम आणि सॉस देखील तयार केले आहेत.

नातेवाईक माझ्या स्वयंपाकाची प्रशंसा करायचे : ई टीव्ही भारत सोबत बोलताना इंद्रप्रीत नागपाल म्हणाल्या की, गेल्या 21 वर्षापासून आमचं कुटुंब मुंबईत राहतं आहे. अमृतसरमध्ये लहानाची मोठी झालेली एक सामान्य मुलगी पुणे, हैदराबाद आणि त्यानंतर मुंबई शहरात आपल्या लोनच्याच्या चवीच्या माध्यमातून लोकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. पतीच्या नोकरीच्या बदल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास राहाता लागलं होतं. तरीदेखील आपला लोणचं बनवण्याचा छंद त्यांनी सोडला नाही. सुरुवातीला घरी नात्यातले लोक यायचे, कौटुंबिक सगे यायचे आणि अतिशय सुंदर आपण जेवण आणि लोणचं तयार करतात असं म्हणत माझ्या स्वयंपाकाची प्रशंसा करायचे. यातून प्रेरणा घेत वेगवेगळी लोणची निर्माण केली आणि आता त्याला व्यवसायाचा स्वरूप प्राप्त झाल आहे असंही त्या म्हणाल्या.

लोणच्याला देशभरातून देखील मागणी : आपण आतापर्यंत विविध फळांपासून तयार केलेली लोणचे खाल्ली आहेत. मात्र, आता चिकन, मटण, प्रॉन पासून लोणचं बनवण्यास सुरुवात केली आहे. या लोणच्याला पुष्कळ मागणी असल्याचंही इंद्रप्रीत सांगताय. 100 पेक्षा जास्त प्रकारचे लोणचे त्यांनी आपल्या घरात छोट्या ढब्ब्यामध्ये साठवून ठेवले आहेत. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे लोणचं पाठवलं जातं. कैऱ्यांपासून तयार केलेले पंधरा वर्षे जुणे लोणचं देखील त्यांच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या लोणच्याला मुंबईतचं नाही तर देशभरातून देखील मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

1 राणा यांच्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांनाही आली पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी

2 पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्रांची अनोखी शक्कल, वाचा कसं गाठलं काझीरंगा पार्क?

3 मामीच्या सौंदर्यावर भाळला भाचा; शरीरसुखाची मागणी, नकार अन् थेट खून

Last Updated : Mar 8, 2024, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.