ETV Bharat / state

अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या, संतापामागं वेगळंच कारण आलं समोर - ABDUL SATTAR SAREE DISTRIBUTION

मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. मात्र, या साड्या मिळताच महिलांनी साड्यांची होळी केली.

ABDUL SATTAR SAREE DISTRIBUTION
महिलांनी साड्या पेटवल्या (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 8:43 PM IST

Updated : Oct 7, 2024, 10:51 PM IST

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साड्यांचं वाटप केलं. मात्र, गावातील महिलांनी एकत्र येत या सगळ्या साड्यांची होळी केल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेत महिलांच्या संतापामागं वेगळंच कारण असल्याचं समोर आलं.

दोन वेगवेगळ्या घटनांमुळं वाद : सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे शनिवारी रात्री व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्याख्यान देणारे व्यक्ती बांगलादेश येथील घुसखोरीबाबत बोलत होते. तेवढ्यात आमच्या समाजाची बदनामी कशाला करता? असं म्हणत एका महिलेनं चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला. काही महिलांनी तिला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेनं अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या कशा चालतात? असं म्हणत गोंधळ घातला. त्यावर संतप्त झालेल्या दोन गावातील महिलांनी भर रस्त्यात वाटलेल्या साड्यांची होळी करत आपला रोष व्यक्त केला. तर याच गावात काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांचे मोबाईल स्टेटस ठेवले म्हणून एका युवकाला मारहाण करण्यात आली होती. या दोन्ही घटनांचा राग ठेवत गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांनी महिलांना भेट दिलेल्या साड्यांची होळी केली.

संतप्त महिलांनी पेटवल्या साड्या (Source - ETV Bharat Reporter)

अब्दुल सत्तार यांनी वाटल्या होत्या साड्या : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात नवरात्रीनिमित्त शुक्रवारी आणि शनिवारी साड्यांचं वाटप केलं होतं. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सुरू होता. तर दुसरीकडे सत्तार यांच्या मतदारसंघातील वांगी बुद्रुक आणि बाहुली या गावांमध्ये त्यांनी वाटप केलेल्या तीनशे ते चारशे साड्यांची गावकऱ्यांनी होळी करत आपला रोष व्यक्त केला. या घटनेवर प्रतिक्रिया घेण्यासाठी मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

  1. 'त्यांना' जाळ्यांशिवाय असलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावलं पाहिजे; राज ठाकरे कडाडले
  2. भाजपा महाविकास आघाडीच्या दाव्यांची करणार पोलखोल; आखली जबरदस्त रणनीती - bjp steering committee
  3. "सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचंही योगदान"; तुतारी हातात घेताच हर्षवर्धन पाटलांची कबुली - Harshvardhan Patil Joins NCP

Last Updated : Oct 7, 2024, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.