ETV Bharat / state

"प्रज्ञा सातव यांना तिकीट दिलं तर विरोधात काम करू..."; ठाकरे गटाच्या खासदाराचा काँग्रेसला इशारा - Nagesh Patil Ashtikar - NAGESH PATIL ASHTIKAR

Nagesh Patil Ashtikar : हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं तक्रार केली. प्रज्ञा सातव यांना तिकीट दिलं, तर विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करू, असा इशारा त्यांनी दिलाय.

Pradnya satav
Pradnya satav (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 12:40 PM IST

हिंगोली Nagesh Patil Ashtikar : विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं चिन्हं दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं तक्रार केली आहे. प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं काम केलं नाही. त्यांना विधान परिषदेचा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आगाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीसाठी नांदेडला आले होते, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

खासदार नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तक्रार (Source - ETV Bharat Reporter)

प्रज्ञा सातव यांनी विरोधात मतदान केलं : नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. "लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडी विरोधात काम केलं आहे. त्यांनी प्रचार केला नाही, असा मी आरोप केला नाही. पण महाविकास आघाडी विरोधात त्यांनी मतदान केलं," असा आरोप खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. "जर काँग्रेस पक्षानं त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं, तर आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करू," असा इशारा खासदार आष्टीकर यांनी दिला. दरम्यान विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रज्ञा सातव मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत.

ठाकरे गटात अंतर्गत वाद : दुसरीकडं खासदार आष्टीकरांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला आहे. सुभाष वानखेडे हे सद्या शिवसेना ठाकरे गटात असून ते हदगाव किंवा उत्तर नांदेडमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र "पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर ठाकरे गटातून उमेदवारी मिळत नाही, असं खासदार आष्टीकर म्हणाले. त्यांच्या विरोधात अजून तक्रार केली नाही, पण ज्या दिवशी ते उमेदवारी मागतील, त्या दिवशी तक्रार करु," असं देखील खासदार आष्टीकर म्हणाले. आष्टीकर यांच्या या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटातही अंतर्गत वाद पहायला मिळत आहेl.

हेही वाचा

  1. संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना: पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट हटू दे, शेतकऱ्यांची मनोकामना - Ashadhi Wari 2024
  2. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; स्विफ्ट आणि अर्टिगाची समोरासमोर धडक, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Samruddhi Highway Accident
  3. अर्थसंकल्पात मोफत घोषणांचा पाऊस, पण वस्तुस्थिती काय? - Atul Londhe On Budget 2024
  4. बहिणीला दिला ४ महिने त्रास, आता आणली लाडकी बहीण योजना : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना - Ladaki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.