मुंबई Heavy Rain Start In Mumbai : मागील तीन दिवस उसंत घेतलेल्या पावसानं देशाच्या आर्थिक राजधानीत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार 15 जुलै ते बुधवार 17 जुलै या तीन दिवस पावसानं दडी मारल्याचं चित्र होतं. मात्र, आज 18 जुलैच्या पहाटेपासून मुंबईत पावसाचं पुन्हा एकदा दमदार आगमन झालं आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसला तरी, दादर, शिव या ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील लोकल दहा ते पंधरा मिनिटांनी उशीरा धावत आहेत.
सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात : आज पहाटेपासून मुंबईत मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील काही भागात एक-दोन हलक्या सरी कोसळल्या. बेस ऑब्झर्व्हेटरी सांताक्रूझमध्ये गेल्या 24 तासात 1 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा इथं 10 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 18 जुलै ते 20 जुलै 2024 या चार दिवसात मुंबईत मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचं क्षेत्र : भारतीय हवामान विभागानं 17 ते 18 जुलै दरम्यान मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच 19 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा 21 जुलै रोजी भू सपाटीच्या दिशेनं सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच्या परिणामामुळे 21 ते 24 जुलै दरम्यान मुंबईसह कोकण भागात वाऱ्याचा वेग वाढेल. तर मुंबईसह कोकणात वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा :
- मुंबईला ऑरेंज अलर्ट : राज्यात 'या' ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता - Orange Alert To Mumbai
- मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert
- मुसळधार पावसाचा दणका; रेल्वे वाहतूक विस्कळीत, तब्बल 50 विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांना मनस्ताप - Heavy Rain In Mumbai