ETV Bharat / state

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून, अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर कोसळली दरड - Satara Rain Update

Satara Rain Update : कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवर (Krishna River) असलेल्या बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला आहे. तसंच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुपारी दरड कोसळली (Crack Collapsed on Ajinkyatara Road) असून कोयना-नवजा मार्गावरील रस्ता खचला आहे.

Satara Rain Update
अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर दरड कोसळली (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 10:31 PM IST

सातारा Satara Rain Update : शहरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार आहे. यामुळं जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळं कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीत वाढ झाली असून या नदीवर भुयाचीवाडी (ता. कराड) येथे असलेल्या बंधाऱ्याचा काही भाग बुधवारी दुपारी वाहून गेला. शहराला लागूनच अजिंक्यतारा किल्ला आहे. तर अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर दरड कोसळली (Crack Collapsed on Ajinkyatara Road) आहे. तसंच कोयनानगर-नवजा हा रस्ता खचला आहे. या तिन्ही घटनांच्या ठिकाणी प्रशासन पोहोचले आहे.

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला (ETV BHARAT Reporter)

पावसामुळं दरडींचा धोका वाढला : सातारा जिल्ह्याला गेली तीन दिवस रेड अलर्ट आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार असल्यानं घाटमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अति पावसामुळं रस्ते खचत असून झाडे देखील उन्मळून पडली आहेत. या आत्पकालीन परिस्थितीत प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचून उपाययोजना करत आहे.

कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे मोठे नुकसान : कराड तालुक्यातील भुयाचीवाडी गावात कृष्णा नदीवर असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा काही भाग बुधवारी पुराच्या पाण्यामुळं वाहून गेला. पाणी पातळी वाढल्यानं पाण्याचा प्रवाह तीव्र आहे. त्याचा फटका बंधाऱ्याला बसला. पाण्याचा वेग आणि दाबामुळं बंधाऱ्याच्या एका बाजूचा मोठा भागच वाहून गेल्यामुळ बंधाऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.

पाटण तालुक्यातील घरांची पडझड : संततधार पावसामुळं पाटण तालुक्यातील कोयना, ढेबेवाडी खोऱ्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वाल्मिकी पठारावर असणारी गावे भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात. त्याठिकाणी पावसामुळे घरांची पडझड झाली असून प्रशासनाने तातडीने आपद्ग्रस्तांना मदत केली आहे. कोयना भागात कामर गावनजीक रस्ता खचला आहे. घाटमार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

हेही वाचा -

  1. 'इथं' विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पाण्यातून जावं लागतं शाळेत... - flooded streem
  2. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात एका रात्रीत ३०० मिलीमीटर पाऊस, पाणीसाठा सत्तरीच्या उंबरठ्यावर - Koyna Dam
  3. साताऱ्यासह रत्नागिरीला रेड अलर्ट; कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Heavy Rain In Mumbai And Satara

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.