ETV Bharat / state

आनंदावर पडलं विरजण; एकीकडं शिक्षक म्हणून नियुक्ती, तर दुसरीकडं वडिलांचा मृत्यू - teacher by Pavitra portal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 10:28 PM IST

Teacher appointment letter : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरनाक यांना शिक्षक म्हणून नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. मात्र, त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर वडिलांचं निधन झाल्याचा संदेश आला. त्यामुळं त्यांना धक्काच बसला. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी त्यांना आधार देत गावी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.

Haribhau Virnak, Karthikeyan S
हरिभाऊ विरनाक, कार्तिकेयन एस (Etv Bharat Reporter)

कोल्हापूर Teacher appointment letter : कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आज जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची सकाळपासूनच धावपळ सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे पोस्टिंगसाठी बोलावण्यात आलं होतं. समुपदेशनाच्या माध्यमातून नवीन गुरुजींची नियुक्ती करण्यात येत असून, राज्यातून निवड झालेले शिक्षक यावेळी उपस्थित होते.

विरनाक यांची शिक्षक म्हणून : नियुक्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरनाक यांना शिक्षक म्हणून नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. मात्र, त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर वडिलांचा मृत्यू झाल्याचा संदेश आला. त्यामुळं हरिभाऊ विरनाक यांना धक्का बसला. अशा संकटात त्यांना आधार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पुढे आले. त्यांनी विरनाक यांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोयही केली. कार्तिकेयन एस. यांच्या माणुसकीनं नवनिर्वाचित शिक्षकनांही काही काळ भारावून टाकलं.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातील हरिभाऊ विरनाक यांनी निवड पत्र देताना त्यांच्या वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यामुळं मी त्यांना आधार देण्याचं काम केलं. जिल्हा परिषदेकडून कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या अडचणींना धावून जाणं मी माझं कर्तव्य समजतो. -कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी

विरनाक यांचं सांत्वन : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरनाक यांना शासकीय शिक्षक झाल्याचा आनंद झाला. मात्र, त्याचवेळी वडिलांचं छत्र हरपल्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी विरनाक यांचं सांत्वन केलं. तसंच त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.

पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं गुरुवार 27 जून रोजी सर्किट हाऊसमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडक शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे पोस्टिंगसाठी बोलावण्यात आलं. समुपदेशनाद्वारे त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. समुपदेशनाद्वारे नियुक्तीची प्रक्रिया सुरू असतानाच शिक्षक हरिभाऊ दिगंबर विरनाक यांच्या वडिलांचं निधन झाल्याचा संदेश आला. समुपदेशनासाठी आलेल्या शिक्षकाच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती कळताच सीईओ कार्तिकेयन एस सभागृहातून बाहेर आले. त्यांनी शिक्षकाचे सांत्वन केलं. संबंधित शिक्षकांना त्यांच्या गाड्यांमधून पाठवण्याचे प्रयत्न केले.

'हे' वाचलंत का :

  1. अजित पवार नको रे बाबा! भाजपावाल्यांनी आवळला सूर, भाजपा-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी - Controversy In BJP Over Ajit Pawar
  2. व्होटबँक म्हणून वापर करण्याऐवजी काँग्रेसनं अमरावतीत मुस्लिम उमेदवार द्यावा; भाजपाची मागणी - Amravati Assembly Constituency
  3. धानाच्या धर्तीवर सोयाबीनसह कापसाला अनुदान द्या; शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं मंजूर करा, भाजपा नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी - BJP Leaders On Farmers Issues

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.