ठाणे Haj Pilgrims Suffering in Saudi Arabia : भारतातून तब्बल 2 लाख तर महाराष्ट्रातून सर्वाधिक 22 हजार हज यात्रेकरू सौदी अरेबियात पोहोचले आहेत. मात्र, सव्वा तीन लाखाची रक्कम हज कमिटीनं घेतल्यानंतरही बस, राहण्याची आणि जेवणाची असुविधा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हज यात्रेकरू नरक यातना भोगत असल्याचा आरोप राज्य हज कमिटी सदस्य बाबलू दादुभाई शेख यांनी पत्रकार परिषेत केला. भारतीय हज कमिटीनं हज यात्रेबाबत मोठा घोटाळा केल्याचंही ते म्हणालेत.
बाबलू दादुभाई शेख शेख यांनी हज यात्रेकरुंची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप केला. या यात्रेत मोठ्या प्रमाणात वृद्धांचाही समावेश असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप हज कमिटी सदस्य शेख यांनी केलाय. हज यात्रेकरूंच्या दुर्दशेचे काही व्हिडिओ सौदी अरेबियातून शेख यांना प्राप्त झाले. ते त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. वृद्ध यात्रेकरूंची अत्यंत गैरसोय होत आहे. तब्बल 52 डिग्री तापमानात या यात्रेकरूंची एका कंपार्टमेंटमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांचा जीव घुसमटत असल्याचा दावाही बाबलू शेख यांनी केलाय.
राज्य हज कमिटी सदस्य असतांनाही आम्ही हज यात्रेकरूंसाठी काहीही करू शकत नाही. आम्ही हताश आहोत. भारतीय हज कमिटीशीदेखील काहीच संपर्क नाही. संपर्क करून हज यात्रेकरूही निराश झालेत - बाबलू दादुभाई शेख (महाराष्ट्र राज्य हज यात्रा कमिटी सदस्य)
सव्वा तीन लाखांची वसूली : " हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी केवळ 90 जणांची टीम उपलब्ध आहे. तसंच या हज यात्रेकरूंची राहण्याची, बसची आणि जेवणाची गैरसोय झाली. हज कमिटीनं हज यात्रेसाठी लोकांकडून घेतलेले सव्वा तीन लाख रूपये गेले कुठे?" असा सवाल बाबलू शेख यांनी उपस्थित केलाय. "भारतीय हज कमिटीनं सर्व अधिकार आपल्याकडं ठेवलेले आहेत. राज्य हज कमिटी सदस्य हे नाममात्र नियुक्त आहेत," असं सागत शेख यांनी निराशा व्यक्त केली.
हेही वाचा -