मुंबई Gym Trainer Attacked : मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरने जिम करण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात व्यायाम करण्यास वापरण्यात येणारा लाकडी मुदगल मारल्याची घटना घडली आहे. ही घटना जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुलुंड येथील फिटनेस इंटलिजियस जिममधील ही काल संध्याकाळची घटना आहे. युगेश शिंदे हा २० वर्षीय तरुण या जिममध्ये जिम करीत असताना या जिममधील ट्रेनर धरव नाकेल याने त्याला ही मारहाण केली आहे. युगेश त्याच्याकडे पाहत असल्याच्या रागातून त्याने ही मारहाण केली आहे. या प्रकरणी युगेशच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
जिम ट्रेनरला अटक : रागात बघत असल्याच्या समजातून व्यायाम प्रशिक्षकाने व्यायामासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगल घातल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे. युगेश शिंदे असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून नवघर पोलिसांनी आरोपी व्यायाम प्रशिक्षक धरव नाकेर याला अटक केली आहे. मुलुंड पूर्व परिसरात कुटुंबासोबत राहत असलेला युगेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याचे वडील रेल्वेत मोटरमन आहेत. तर, आई केईएम रुग्णालयात फार्मासिस्ट आहे. युगेश हा गेल्या दोन वर्षांपासून मुलुंड पूर्वेकडील फिटनेस इंटेलिजन्स नावाच्या व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी जातो. कॉलेजला सुट्टी असल्याने बुधवारी सकाळी पाच वाजता तो व्यायामशाळेत गेला होता.
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद : युगेश हा व्यायाम करत असताना साडे सहाच्या सुमारास व्यायाम प्रशिक्षक नाकेर येथील लाकडी मुगदल उचलून त्याच्या डोक्यात घातला. या घटनेने व्यायामशाळेत एकच खळबळ उडाली. अन्य सहकाऱ्यांनी नाकेर याला अडवत जखमी अवस्थेतील युगेशला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. नाकेर याने युगेशवर केलेल्या हल्ल्याची घटना व्यायामशाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत युगेशची फिर्याद नोंदवून घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून नाकेरला अटक केली आहे.
हेही वाचा :