ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त गडावर येऊ नका, पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना असे आवाहन का केले? - Gopinath Munde Death Anniversary

Gopinath Munde Death Anniversary लोकनेते गोपीनाथ मुंडे याचा ३ जून रोजी दहावा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे राज्यभरातील कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामागील कारण जाणून घेऊ.

Pankajatai Munde
पंकजाताई मुंडे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 9:43 AM IST

Updated : Jun 2, 2024, 10:29 AM IST

कार्यकर्त्यांना आवाहन करताना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (ETV Bharat)

बीड Gopinath Munde Death Anniversary : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा येत्या 3 जून रोजी दहावा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील समस्त कार्यकर्त्यांना यावर्षी गोपीनाथ 'गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा' असे आवाहन केलं. त्यांच्या 'फोटोचं पूजन करा'. एखादा चांगला 'संकल्प' करा असं आवाहन केलं आहे. 4 जूनला लोकसभेची मतमोजणी असल्यानं आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंकजा यांचं कार्यकर्त्यांना आवाहन: पंकजा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीओ जारी करून कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केलं आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले, "दरवर्षी 3 जून हा दिवस येतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान आपल्यातून गेले. माझा पिता हरवला. तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर आणि माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम केलं. आज दहा वर्षे झाली. पण तरीही तुम्ही न चुकता 3 जूनला गोपीनाथ गडावर येता.

कार्यकर्त्यांची अडचण लक्षात आलीय- "यावेळेस एक योगायोग आलेला आहे. तो म्हणजे 3 जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे. 4 जूनला लोकसभेचे मतदान आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, काऊंटिंग एजंटला 3 जून रोजी संध्याकाळीच बीडला जावं लागतं. कारण पहाटे उठूनच त्यांना काऊंटिंगसाठी जावं लागते. मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे. आपली सगळ्यांची इच्छा असूनदेखील आपल्या सर्वांना यायचं आहे. ही तळमळ मी समजू शकते. म्हणून मीच तुमची ही अडचण दूर करायचं ठरवलं आहे."

जिथं आहात तिथूनच पुण्यस्मरण करा: मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की, " आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल. 4 जूनला मुंडे साहेबांच्या विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया. यावेळेस येता आले नाही तर मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका. आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगले समाजोपयोगी कार्यक्रम करणार आहोत. त्यावेळी फार मोठया संख्येने आपण उपस्थित राहा. दरवर्षी कीर्तन आणि भोजन असते. ते आम्ही यावर्षी रद्द केलेलं आहे. आपली अडचण टाळावी, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील माझ्या समस्त लोकांना विनंती करते की, यावेळेस 3 जूनला आपण कृपया 'गोपीनाथ गडावर येवू नये'. ही विनंती आपण नक्की मान्य कराल. माझ्या या विनंतीचा मान राखाल,एवढीच आपल्याकडून अपेक्षा करते."

हेही वाचा

  1. देशात 'इंडी' आघाडी सत्तेत आल्यास 'मिशन कॅन्सल', मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा प्लॅन - Narendra Modi Beed Sabha
  2. पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde

Last Updated : Jun 2, 2024, 10:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.