ETV Bharat / state

पक्षाने तिकीट दिले तरी आता घेणार नाही, गोपाळ शेट्टींनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज - MAHARASHTRA ELECTION 2024

आता मला पक्षाने तिकीट दिले तरी मी तिकीट घेणार नाही, अशी भूमिका गोपाळ शेट्टींनी घेतलीय. त्यामुळे शेट्टींनी एक प्रकारे पक्षाला रामराम ठोकल्याचं बोललं जातंय.

Gopal Shetty
गोपाळ शेट्टी (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 4:45 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात सध्या चांगलंच वातावरण तापलंय. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तर दुसरीकडे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा ज्यांचे तिकीट कापले गेलंय, अशा अनेक नेत्यांनी बंड केलंय. मुंबादेवी मतदारसंघात शायना एनसी यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अतुल शाह यांनी बंड केलंय. तर दुसरीकडे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्ये यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार गोपाळ शेट्टी नाराज झाले असून, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान, अर्ज दाखल करायच्या आधी जरी आता मला पक्षाने तिकीट दिले तरी मी तिकीट घेणार नाही, अशी कठोर भूमिका गोपाळ शेट्टी यांनी घेतलीय." त्यामुळे आता गोपाळ शेट्टींनी एक प्रकारे पक्षाला रामराम ठोकल्याचं बोललं जातंय.

म्हणून निर्णय घेतला...: लोकांचं खूप प्रेम आहे. लोकांच्या प्रेमाखातर मी आज नामांकन अर्ज भरलाय. बोरिवली विधानसभा मतदारसंघात चुकीचं घडतंय. ते सर्वांना कळतय. भारतीय जनता पक्षासोबत राहून इथे जे काही चुकीचं घडतंय ते दुरुस्त करणं यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगत बोरीवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माझी लढाई ही कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही. तर या निर्णयाच्या विरोधात आहे. संजय उपाध्ये यांना भाजपातून उमेदवारी दिलीय. ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांचं चांगलं काम आहे. तसेच मी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली असती. पण तसे केले नाही. येथे प्रत्येक वेळी उमेदवार आयात का करावा लागतो किंवा बाहेरील उमेदवार का लागतो. इथली लोकभावना लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला असल्याचंही गोपाळ शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय. मला लोकांनी आपलं समजून मतदान करावं. बोरिवलीतील लोकांवरती अन्याय होतोय. त्यामुळे मी ही भूमिका घेतलीय. आता जरी पक्षाने मला तिकीट दिले तरी मी माघार घेणार नाही, असं मोठं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलंय. त्यामुळे शेट्टी हे आता भाजपातून एक प्रकारे बाहेर पडल्यासारखेच असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

उमेदवार आयात करावा का लागतो?: दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे इथे भाजपाची बऱ्यापैकी ताकद असून, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. येथे लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल हे मोठ्या फरकाने जिंकून आलेत. या मतदारसंघात अनेक भाजपाचे आमदार आहेत. परंतु इथे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत नेहमी उमेदवार हा आयातच करावा लागतो किंवा बाहेरील उमेदवार का मागावा लागतो? असा सवाल गोपाळ शेट्टींनी उपस्थित केलाय. स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत, म्हणून आपण बंड पुकारलं असल्याचं गोपाळ शेट्टींनी सांगितलंय. दरम्यान, शेट्टींनी बंड पुकारल्यानंतर त्यांची पक्ष कशी मनधरणी करतो किंवा त्यांची कशी समजूत काढतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; अनिल देशमुखांच्या मुलाला उतरवलं रिंगणात
  2. बारामतीत कोण जिंकणार? काका की पुतण्या; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.