ETV Bharat / state

सोने तस्करीचं वाढलं प्रमाण, चारच दिवसांत विमानतळावरून तीन किलो सोनं जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:13 AM IST

Gold Seize : मुंबई कस्टम झोन III नं 1 ते 4 मार्च 2024 या चार दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1.66 कोटी रुपये किमतीचं 3.03 किलो सोनं आणि दोन आयफोन दहा वेगवेगळ्या प्रकरणात जप्त करण्यात आले आहेत.

gold smuggling case
gold smuggling case

मुंबई Gold Seize : 1 मार्च ते 4 मार्च दरम्यान, मुंबई कस्टम झोन 3 नं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत 1 कोटी 66 लाख रुपये किमतीचं तीन किलोग्राम सोनं जप्त केलंय. चार दिवसात 10 वेगवेगळ्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमूल बटरच्या क्यूबमध्ये सोनं लपवून आणल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई कस्टम झोन 3 नं 10 प्रकरणांमध्ये 3.03 किलो सोनं तसंच 1.66 कोटी रुपये किमतीचे 2 आयफोन जप्त केले आहेत.

  • प्रकरण 1: इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना इंडिगो फ्लाइट 6E 1122 (फुकेत ते मुंबई) मध्ये प्रवासी सीटखाली 700.00 ग्रॅम वजनाच्या 24 KT सोनं सापडलं होतं. जप्त केलेले सोनं मुंबई कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
  • प्रकरण 2: एअर इंडिया फ्लाइट AI 920 नं दुबईहून मुंबईला प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाला अडवण्यात आलं होतं. त्याच्याकडं 390.00 ग्रॅम (एकूण) वजनाच्या मेणात 24 कॅरेट सोन्याची पावडर लपवून ठेवल्याचं आढळून आलं.
  • प्रकरण 3 : मुंबई विमानतळाच्या सफाई कर्मचाऱ्यांना वॉशरूममध्ये 390.00 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची पावडर मेणात लपवलेली सापडली होती. जप्त केलेलं सोनं मुंबई कस्टमच्या अधिकाऱ्यांकडं सोपवण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
  • प्रकरण 4 : सिंगापूर एअरलाइन्स फ्लाइट SQ 424 द्वारे सिंगापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाकडं 235.00 ग्रॅम वजनाचं 24 कॅरेट गोल्ड सापडलं आहे.
  • प्रकरण 5 : सौदीया एअरलाइन्स फ्लाइट SV 740 द्वारे रियाध ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाकडं 233.00 ग्रॅम वजनाच्या 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या आढल्या आहेत. त्यानं हे सोन शरीरात लपवलं होतं.
  • प्रकरण 6 : एमिरेट्स फ्लाइट EK 504 द्वारे दुबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 230.00 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे दागिनं आढळले आहेत.
  • प्रकरण 7 : स्पाईसजेट फ्लाइट SG 60 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहेत. त्याच्याकडं 24 कॅरेट सोन्याचे दागिने (2 नग ) आणि 22 कॅरेट सोन्याची साखळी (1 नग ) एकत्रितपणे 220.00 ग्रॅम सोन सापडलंय.
  • प्रकरण 8 : एमिरेट्स फ्लाइट EK 504 द्वारे दुबई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आलीय. या नागरिकानं परिधान केलेल्या कपड्यांमध्ये 24 कॅरेट गोल्ड काडा (1) रोडियम प्लेटेड 220.00 ग्रॅम वजनाचा माल आढळून आलाय.
  • प्रकरण 9 : एअर इंडिया फ्लाइट AI 984 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाकडं 24 कॅरेट सोन्याचं दागिने (नग 5), रोडियम प्लेटेड, नाणी (नग 3) असं एकत्रितपणे 215.00 ग्रॅम वजनाचें सोने सापडंलय. तसंच 2 आयफोन (प्रो 128) जीबी) आढळून आल्यानं फोनदेखील जप्त करण्यात आला आहे.
  • प्रकरण 10 : इंडिगो फ्लाइट 6E 1395 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला चौकशी केली असतात त्याच्याकडं 200.00 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची साखळी (नेट) लपवलेली आढळून आली.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.