ETV Bharat / state

"बांगलादेशात अन्याय होत असलेल्या हिंदूंना भारतात आश्रय द्या", महंत रामगिरी महाराजांची मागणी - RAMGIRI MAHARAJ

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात शहरात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर रामगिरी महाराज यांनी संताप व्यक्त करत बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अन्याय थांबवा अशी मागणी केली.

Ramgiri Maharaj
रामगिरी महाराज (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 5:29 PM IST

छत्रपती संभाजीनगर : जगात अन्याय होणाऱ्या हिंदूंना देशात आश्रय द्यावा अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी केली. बांगलादेश स्वतंत्र होत असताना भारतानं मदत केली होती, मात्र तिथेच जर असा अन्याय होत असेल तर तो सहन करण्यासारखा नाही. आम्ही मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळं आम्ही मागणी करू शकतो अशा भाषेत महंतांनी भाजपाला टोला लगावलाय.

अतिरेक्यांना जाळून मारा : बांगलादेशात हिंदू समाजावर अन्याय केला जातोय असा आरोप करत बांगलादेश अल्पसंख्याक बचाव मोर्चाच्या वतीनं छ. संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात महंत रामगिरी महाराज यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं होतं. त्यामध्ये "बांगलादेशात जे हिंदू मारले गेले त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील रितीरिवाजाप्रमाणे केले जात नाहीत. आपल्याकडं दहशतवाद्यांना जात धर्म नसतो असं म्हणत, त्यांच्याच रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात असं का? त्याला जर कुठला जात, धर्म नसेल तर सरळ जाळून टाका", अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी केली.

प्रतिक्रिया देताना रामगिरी महाराज (ETV Bharat Reporter)

"एक है तो सेफ है" : "बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्या अशी मागणी जाहीर कार्यक्रमात करण्यात आली होती. यावेळी 'एक है तो सैफ है' असा नारा देण्यात आला. मात्र त्याचा अर्थ चुकीचा घेण्यात येत आहे. आपण जर जाती जातीत भांडून वेगळे राहिलो तर अडचण होईल. त्यामुळं एकत्र राहा असा अर्थ आहे." असं स्पष्टीकरण धर्मगुरूनी दिलं.

हिंदूंना आश्रय द्या : "बांगलादेशात कोरोना काळात ज्यांनी अन्न पुरवलं त्याच इस्कॉन मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. तेथील गुरूना ताब्यात घेण्यात आलं होतं. अन्याय होत असताना केंद्र सरकारनं लवकरात लवकर यासाठी पावले उचलायला हवी. असे अत्याचार हिंदूंवर बांगलादेशात होत असतील तर, त्या हिंदूंना आपण आपल्या देशात आश्रय दिला पाहिजे" अशी मागणी या सभेत करण्यात आली. मागे तिकडच्या परिस्थितीवर बोललो तर मोठे वादळ निर्माण झाले. एकीकडं तुम्ही संविधान दाखवत आहात आणि दुसरीकडं मोठं मोठे मोर्चे काढून घोषणा देत आहात. एकीकडं संविधान मानत आहात असं सांगायचं आणि दुसरीकडं गोंधळ घालायचा, जाळपोळ करायची अशी टीका रामगिरी महाराज यांनी केली.

वक्फनं मंदिरावर दावा कसा केला : वक्फ बोर्डानं काही जमिनींवर दावा केला, त्यात सप्तशृंगी आणि कानिफनाथ मंदिरावर दावा सांगितलाय. ही मंदिरं अतिप्राचीन आहेत, त्यांच्यावर दावा कसा केला जाऊ शकतो. मुद्दाम असे दावे केले जात असल्याचा आरोप महंत रामगिरी महाराज यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. रामगिरी महाराजांचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश - Ramgiri Maharaj Controversial video
  2. रामगिरी महाराजांविरोधात अल्पसंख्यकांमध्ये संतापाची लाट; माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Ramgiri Maharaj Controversy
  3. रामगिरी महाराज यांच्या समर्थनात श्रीरामपुरात रास्ता रोको; समर्थकांकडून संरक्षणाची मागणी - Ramgiri Maharaj Controversy

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.