ETV Bharat / state

गणेशोत्सव 2024 : मुंबईकरांनो गणपती विसर्जनाला जाताना घ्या काळजी ; महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी - BMC Guidelines For Ganesh Immersion

BMC Guidelines For Ganesh Immersion : राज्यभरात आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष सुरू आहे. मात्र दीड दिवसाच्या गणरायाचं विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

BMC Guidelines For Ganesh Immersion
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 2:10 PM IST

मुंबई BMC Guidelines For Ganesh Immersion : गणपती बाप्पाचं आज आगमन होत असून मुंबईत लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गणपती विसर्जनाची तयारी केली आहे. दीड दिवसांच्या तसेच सात दिवसांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेनं चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव सज्ज ठेवली आहेत. अशातच आता गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणपती विसर्जनात गणेश भक्तांनी काळजी घेण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

'ट्रायल नेटिंग'मध्ये आढळले अपायकारक मासे : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागानं केलेल्या 'ट्रायल नेटिंग'मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. याबाबतची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडून कळवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी गणपती विसर्जनासाठी समुद्रात न जाण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे.

जेली फीश, ब्लू जेली फीश आढळल्यानं सावधानता बाळगण्याचे आवाहन : महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागानं गिरगाव आणि दादर चौपाटी इथं गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचं अस्तित्व आहे का? यासाठीची नुकतीच चाचपणी केल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या चाचणी दरम्यान, ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आले आहेत. नेटींग दरम्यान पाकट (स्टिंग रे) हे मासे आढळून आले आहेत. या माशांसोबतच जेली फीश, ब्लू जेली फीश हे अपायकारक मासे आढळून आल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

महापालिकेनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना : समुद्रात जेलीफिशसह अन्य दंश करणारे मासे आढळल्यानं महापालिकेनं आता मुंबईकरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान मुंबईकरांनी काय काळजी घ्यावी? याची माहिती महापालिकेनं दिली आहे. महापालिकेच्या या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणं आहेत.

  • १. श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक आणि संबंधित यंत्रणेमार्फत करावे.
  • २. श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगानं समुद्रात प्रवेश करणं टाळावं.
  • ३. गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये, म्हणून गमबुटांचा वापर करावा.
  • ४. बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणानं पालन करावं.
  • ५. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तत्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.

हेही वाचा :

  1. LIVE : लाडक्या बाप्पाचं मुंबईत आगमन; 'लालबागचा राजा'चं दर्शन घेण्यासाठी लोटला जनसागर - Lalbaugcha Raja 2024 Live Dasrshan
  2. लाइव्ह गणेशोत्सव 2024: लाडक्या बाप्पाचं आगमन; भाविकांचा उत्साह शिगेला, उद्धव ठाकरे सपरिवार 'लालबागचा राजा' चरणी - Ganeshotsav 2024 Live Update
  3. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन - Ganeshotsav 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.