पुणे Pune Ganeshotsav 2024 : सध्या गणेशोत्सव सुरू असून पुणे शहरातील गणेशोत्सव (Ganesh Festival 2024) पाहण्यासाठी जगभरातून गणेशभक्त येत असतात. पुणे शहरात मानाचे तसंच विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देण्यासाठी विविध राजकीय व्यक्ती, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील लोकांकडून भेट दिली जाते. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह घरगुती मंडळाकडून देखील विविध विषयांवर देखावा साकारण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेचा साकारला देखावा : नुकतेच राज्य सरकारच्या वतीनं 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) करण्यात आली आहे. जरी महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून संघर्ष सुरू असला तरी, पुण्यातील काटेवाडी येथील सरपंच मिलिंद काटे यांनी आपल्या घरी लाडकी बहीण योजनेचा देखावा साकारला आहे.
दरवर्षी आम्ही सामाजिक विषय घेऊन देखावे सादर करतो. सरकारनं सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' चांगली आहे. त्यामुळं आम्ही यंदा लाडकी बहीण योजनेचा देखावा केला आहे. अजित पवारांनी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला आहे तो देखील अतिशय चांगला आहे. बाप्पाला एकच प्रार्थना आहे की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत. - अनिता काटे
अजित पवारच मुख्यमंत्री व्हावेत : पुण्यातील काटेवाडी येथील सरपंच मिलिंद काटे यांच्या घरी दरवर्षी विविध देखावे साकारले जातात. यंदा त्यांनी आपल्या घरी लाडकी बहीण योजनेचा देखावा साकारला आहे. याबाबत प्रियंका काटे म्हणाल्या, "आम्ही गेली 20 वर्ष गौरी बसवत आहोत. दरवर्षी चालू घडामोडींवर आम्ही घरात देखावा तयार करतो. यंदा राज्यात सरकारनं जी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली आहे". ही अतिशय चांगली योजना असून आम्हा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत.
हेही वाचा -