ETV Bharat / state

लालबागच्या राजाला भरभरून दान; भाविकांनी अर्पण केले 34 तोळे सोनं अन... - Lalbaugcha Raja - LALBAUGCHA RAJA

Lalbaugcha Raja : मुंबईत गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यावेळी हजारो भाविकांनी राजाच्या चरणी लाखो रुपयांचं आणि दागिन्यांचं दान करतात. यंदा दुसऱ्या दिवशी दानपेटीत भाविकांनी 34 तोळे सोनं जमा केलं आहे.

Ganeshotsav 2024
लालबागच्या राजाच्या चरणी लालबागच्या राजाच्या चरणी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 10:32 PM IST

मुंबई Lalbaugcha Raja : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. पहिल्या दोन दिवशी लाखो भाविकांनी गणरायांचं दर्शन घेतलं आहे. 'लालबागचा राजा'च्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दान रूपातील पैशाची मोजणी कालपासून (8 सप्टेंबर) सुरू झाली आहे.

दोन दिवसात इतकी रक्कम जमा : पहिल्याच दिवशी 'लालबागच्या राजा'च्या चरणी भाविकांनी 48 लाख 30 हजार रुपये अर्पण केलेत, तर दुसऱ्या दिवशी राजाच्या स्टेजवरील दानपेटीत 41 लाख 30 हजार तर रांगेतील दानपेटीत 25 लाख 80 हजार जमा झाल्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितलं. दोन दिवसात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी 67 लाख 10 हजार दान अर्पण केलं आहे. दोन दिवसात 1 कोटी 15 लाख 40 हजार रुपये दानपेटीत जमा झाले आहेत.

गणरायांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी : 'लालबागचा राजा' यंदा मयूर महलात विराजमान झाला असून आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तुडुंब गर्दीत देखील महिला, पुरुष, अबाल नागरिक, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक दूरवरून येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ठिकठिकाणी दानपेट्या ठेवल्या आहेत. या दान पेट्यांमध्ये भाविक आपल्या स्वेच्छेनं दान अर्पण करतात. कोणी सोन्या-चांदीच्या वस्तू तर कोणी पैशाच्या स्वरूपात दान या दानपेटीत अर्पण करतात. या जमा झालेल्या दानाची रविवारपासून मोजणी सुरू झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी दान मतमोजणीत सहभागी झाले आहेत. तर मोजणीचं काम अनंत चतुर्दशीच्या आदल्यादिवशी पर्यंत सुरू राहणार आहे.

दुसऱ्या किती दान : यंदा पहिल्याच दिवशी शनिवार असल्यामुळं मोठ्या संख्येनं भाविकं राजांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी जमा झालेल्या दानाची मोजणी करण्यात आली. एकूण 67 लाख 10 हजार रुपये लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केल्याचं मंगेश दळवी यांनी सांगितलं. तसंच बाप्पांच्या चरणी दुसऱ्या दिवशी 339.770 ग्राम सोनं आणि 6368 ग्राम चांदी अर्पण करण्यात आल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ... - Ganeshotsav 2024
  2. युगांडा येथे पारंपरिक गणेशोत्सव; छत्रपती संभाजीनगर येथील अनंत पांडव यांचा पुरोहित म्हणून सन्मान - Ganeshotsav 2024
  3. अमित शाहांचा मुंबई दौरा; निमित्त गणरायाच्या दर्शनाचं, कारण निवडणुकीच्या राजकारणाचं - Amit Shah Mumbai Visit

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.