ETV Bharat / state

'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Dagadusheth Ganpati Pune : पुण्यातील गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. बाप्पाचं आगमन होत आहे. यानिमित्तानं शहरात सर्वांत जल्लोषपूर्ण वातावरण आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा अत्यंत लोकप्रिय आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं आगमन झालं.

Dagadusheth Ganpati Pune
दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 12:01 PM IST

Updated : Sep 7, 2024, 2:12 PM IST

पुणे Dagadusheth Ganpati Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ही पुणे शहराची खरी ओळख आणि मान बनलेला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. ढोल-ताशा पथकांचा निनाद, नगारा आणि सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर, बँड पथकाचे बहारदार वादन, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, पारंपरिक पेहरावातील उत्साही कार्यकर्ते आणि मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी अश्या उत्साहपूर्ण वातावरणात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन झालंय.

दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन (Source - ETV Bharat Reporter)

ढोल ताशाच्या गजरात आगमन : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त पुणे शहरात सर्वच गणेशोत्सव मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. यंदाही उत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली असून ढोल-ताशा पथकांचा गजर, बँड पथकांचं वादन मिरवणुकीत होत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक मुख्य मंदिरातून सकाळी पावणे नऊ वाजल्याच्या सुमारास सुरूवात झाली. 11 वाजून 11 मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सिंह रथातून गणरायाची मिरवणूक : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचं यंदा 132वं वर्ष असून यंदाच्या गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापणेपूर्वी सकाळी पावणे नऊ वाजल्याच्या सुमारास मुख्य मंदिरापासून सिंह रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर सिंहाच्या 2 मूर्ती लावण्यात आल्या असून मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक काढण्यात आली. यात देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.

हेही वाचा

  1. लाइव्ह गणेशोत्सव 2024: लाडक्या बाप्पाचं आज होणार आगमन; भाविकांचा उत्साह शिगेला, सिद्धिविनायकाची सकाळीच पार पडली आरती - Ganeshotsav 2024 Live Update
  2. शाडू मातीपेक्षा 'मातीचा बाप्पा' चांगला, 1661 जणांनी बनवली बाप्पांची मातीची मूर्ती, मनीषा चौधरी राबवतात मोहीम - Ganeshotsav 2024
  3. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; बंदोबस्तासाठी 15 हजार पोलीस तैनात - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 7, 2024, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.