ETV Bharat / state

'पुढच्या वर्षी लवकर या...' नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुसज्ज व्यवस्थेत सातव्या दिवशी श्रीगणेशमूर्तींचं विसर्जन - Ganesh Utsav 2024

Ganesh Visarjan 2024 : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सातव्या दिवशी 3086 बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Ganesh Visarjan 2024
श्रीगणेशमूर्तींचं विसर्जन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 6:39 AM IST

नवी मुंबई Ganesh Visarjan 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेनं 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी केलेल्या सुसज्ज विसर्जन व्यवस्थेमध्ये सातव्या दिवशी 3086 श्रीगणेशमूर्तींना भाविकांनी 'पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरात भावपूर्ण निरोप दिला. विशेष म्हणजे यात 333 शाडूच्या मूर्तींचाही समावेश होता. पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करुन पर्यावरणशील दृष्टीकोन जपणाऱ्या गणेशभक्तांना विशेष प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे 137 इतक्या मोठ्या संख्येनं निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचं विसर्जन करणाऱ्या 591 पर्यावरण जागरुक नागरिकांनाही कापडी पिशव्यांचं वितरण करुन गौरविण्यात आलं.

इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सवास नवी मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनास पर्यावरण जागरुक नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वच विसर्जन स्थळांवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विविध सोयी पुरविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांना विसर्जनस्थळी निरोपाची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबलची पुरेशा संख्येनं मांडणी करण्यात आली होती. निर्माल्य टाकण्यासाठी ओल्या व सुक्या स्वतंत्र निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच ते संकलित निर्माल्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय कचरामुक्तीच्या दिशेनं आणखी पुढचं पाऊल उचलत मुख्य विसर्जनस्थळांवर 'फोर आर'च्या अनुषंगानं चार डबे ठेवून जागरुकता करण्यात आली.

नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था : नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था केली होती. तसंच आवश्यक विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्थाही करण्यात आली होती. नैसर्गिक विसर्जन स्थळापासून नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथकं तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीनं व्हावं याकरिता आवश्यक संख्येनं स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांमार्फत कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीनं दक्ष होते. कोपरखैरणे सेक्टर-19 येथील धारण तलावात आधुनिक स्वरुपाचा यांत्रिकी तराफा बसविण्यात आला असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग आकारानं मोठ्या व वजन जास्त असलेल्या गणेशमूर्तींसाठी झाला. सार्वजनिक गणेशोत्साव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या यांत्रिकी तराफ्याच्या आधुनिक सुविधेचं कौतुक केलं. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 159 विसर्जन स्थळांवर 3086 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद : महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन 'इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव' साजरा करण्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. तसंच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करुन अनेक नागरिक पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित करत आहेत. अशाच प्रकारचं सहकार्य अनंतचतुर्दशीदिनी होणाऱ्या विसर्जनप्रसंगीही नागरिकांनी द्यावं व घराजवळच्या कृत्रिम तलावात श्रीमूर्तींचे शांततेनं व भाविकतेनं विसर्जन करावं असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलं.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 'या' दिवशी धावणार, कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली; चाचणी पूर्ण - Kolhapur Vande Bharat Express

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.