ETV Bharat / state

गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात भक्तांची मोठी गर्दी - गणेश जयंती

Ganesh Jayanti : गणेश जयंती निमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता मुख्य गणेशजन्म सोहळा होईल.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 8:40 AM IST

पाहा व्हिडिओ

पुणे Ganesh Jayanti : पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात आज (13 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा साजरा होणार आहे.

दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन : दगडूशेठ हलवाई मंदिर आज पहाटे 3 वाजल्यापासून दर्शनासाठी खुलं असून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळ पासूनच नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. भाविकांच्या स्वागतासाठी गणेश मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिर खूपच सुंदर दिसत आहे.

दुपारी 12 वाजता मुख्य गणेशजन्म सोहळा : आज पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी स्वराभिषेकातून श्रीं च्या चरणी गायनसेवा अर्पण केली. सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 या दरम्यान गणपती सूक्त अभिषेक देखील होतो आहे. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येईल.

मंदिरात फुलांची आकर्षक सजावट : यंदाचा गणेशजन्म सोहळा देखील सुवर्ण पाळण्यात पार पडणार आहे. सायंकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येनं सहभागी होतील. रात्री 8 वाजता महाआरती आणि त्यानंतर रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी मंदिर सजवण्यात आलं असून, मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. परिक्रमा सोहळ्यासाठी साईनगरी सज्ज; देश विदेशातील साईभक्त होणार सहभागी
  2. सावधान! शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीची झीज होतेय, लवकरच उचला 'ही' पावलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.