ETV Bharat / state

जयपूर ज्वेल्स ग्लोबल लि. विरोधात फसवणुकीचा गुन्हा, EOW करणार तपास - fraud with customer - FRAUD WITH CUSTOMER

Jewelery Company Fraud : मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात 11 कोटी 71 लाख 89 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी आज (5 एप्रिल) जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड आणि अमित नाहेटा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधान कलम 34 आणि 409 420 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Jewelery Company Fraud
EOW करणार तपास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 11:01 PM IST

मुंबई Jewelery Company Fraud : तक्रारदार नितीन कुमार डिडवानिया (वय 49) हे व्यावसायिक असून ते नेपियन-सी रोड येथील क्षितिज अपार्टमेंटमध्ये राहतात. हेजल मार्कंड डायल लिमिटेड कंपनीमध्ये नितीन कुमार मॅनेजिंग डायरेक्टर पदावर काम करत असून कंपनी मार्फत वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून खनिज तेल, मेटल आयात-निर्यात तसेच विक्रीचा व्यवसाय ते करतात. फोर्ट परिसरात त्यांचे कार्यालय आहे. तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, 2010 पासून तक्रारदार नितीन कुमार हे जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित सुभाष नाहेटा यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. ग्रँड रोड येथील नाना चौक परिसरात अमित नाहेटा यांची जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड नावाची नामांकित कंपनी आहे. अमित नाहेटा यांचा हा ज्वेलरीचा व्यवसाय असून या कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर ते काम करतात. यापुढील सर्व तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांनी दिली आहे.

व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले : तक्रारदार नितीन कुमार यांनी पत्नी नीती हिच्या नावाने जून 2017 मध्ये सोन्याचे बार जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड येथून खरेदी केले होते. त्यानंतर सोन्याचे बार नितीन कुमार यांनी घरातील तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवले होती. नंतर जून 2017 दरम्यान नितीन कुमार आणि अमित नाहेटा यांचा मित्र नवनीत सराफ यांच्या नेपेन्सी रोडवरील राहत्या घरी एका मीटिंग दरम्यान अमित नाहेटा याने नितीन कुमार यांना खरेदी केलेल्या सोन्याच्या बारबाबत विचारणा केली. त्यावेळी अमित नाहेटा याने जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड ही नावाजलेली कंपनी असून सोन्याचे बार घरी ठेवण्यापेक्षा जयपूर ज्वेलर्स ग्लोबल लिमिटेड कंपनीमध्ये व्यवसायासाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

अशा प्रकारे झाली फसवणूक : आरोपी अमित नाहेटा याने तक्रारदार नितीन कुमार यांना आमिष दाखवले की, तुमच्याकडे असलेले सर्व सोन्याचे बार गुंतवणूक किंवा कर्जाच्या स्वरूपात जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड कंपनीमध्ये ठेवल्यास वार्षिक नऊ टक्के सोन्याच्या स्वरूपात अतिरिक्त देणार असून त्यामध्ये मोठा फायदा होईल. त्याप्रमाणे अमित नाहेटा याच्या आमिषाला बळी पडून तक्रारदार नितीन कुमार यांनी 12128 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार अमित नाहेटा यांच्या जयपूर ज्वेल्स ग्लोबल लिमिटेड या दुकानामध्ये जाऊन त्यांच्याकडे विश्वासाने दिले. याबाबत लेखी करार करण्यासंदर्भात सांगितले असता अमितने विश्वास देऊन एका वर्षामध्ये कंपनी मधून व्याजाच्या स्वरूपात नऊ टक्के अतिरिक्त सोने खात्रीशीर देणार असल्याची बतावणी करून लेखी करार करण्यास टाळाटाळ केली.

सोन्याचे बार परत करण्यास टाळाटाळ : तक्रारदार यांनी तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अमित नाहेटा त्याच्याकडे अतिरिक्त सोन्याबाबत विचारणा केली असता त्याने सध्या जयपूर ग्लोबल लिमिटेड कंपनीचा व्यापार मंद असल्याने एका वर्षांनी देतो असे सांगितले. अमितवर विश्वास ठेवून एक वर्ष तक्रारदाराने वाट पाहिली. त्यानंतर अमित नाहेटा याने विश्वास दिल्याप्रमाणे 9% सोने परत देण्यात असमर्थता दाखवली. तसेच 3 कोटी 55 लाख 32 हजार 631 रुपये किमतीचे सोन्याचे बार परत करण्यास अमित टाळाटाळ करू लागल्याने तक्रारदार नितीन कुमार यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण दागिने विकत घेण्याची भाविकांनी सुवर्णसंधी, गुढीपाडव्याच्या दिवशी होणार लिलाव - Siddhivinayak Mumbai
  2. येस बँक फसवणूक प्रकरणी एचडीआयएल प्रवर्तकांवर ईडीची कारवाई, 40.37 कोटीची मालमत्ता केली जप्त - ED Action Against HDIL Promoters
  3. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावं लागेल : विनायक राऊत - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.