ETV Bharat / state

नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के मढवींना लाच घेताना खंडणी विरोधी पथकाकडून अटक - corporator MK Madhvi arrested - CORPORATOR MK MADHVI ARRESTED

MK Madhvi Arrested : नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. त्यांच्यावर ठेकेदाराला 2.5 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

Former Navi Mumbai corporator MK Madhvi
Former Navi Mumbai corporator MK Madhvi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 10:39 PM IST

एम. के मढवींना लाच घेतना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

ठाणे MK Madhvi Arrested : केबल टाकण्यासाठी ठेकेदाराकडून अडीच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम.के. मढवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यावर ठेकेदाराला 2.5 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

1 लाखांची खंडणी पकडलं : नवी मुंबईतील ऐरोली परिसरात केबल वायर टाकण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याचा आरोप आहे. केबळ टाकण्यासाठी मला अडीच लाख द्या, अशी मागणी मढावी यांनी केबल ठेकेदाराकडं केली. त्यानंतर पोलीस पथकानं सापळा रचत त्यांना 1 लाखांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं आहे. ऐरोलीच्या माजी नगरसेविका असलेल्या मढवी या उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहेत. त्यांना ऐरोली सेक्टर 5 मधील त्याच्या कार्यालयातून अटक करण्यात आली.

यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात अटक : यापूर्वी त्यांना अनेकदा मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तुरुंगातून निवडणूक लढवून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकलीय. माजी आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या वादामुळं त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

दोन वर्षांसाठी तडीपार : शिवसेना नेते माजी नगरसेवक एम. के मढवी यांना मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होतं. शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दबाव टाकत आहेत, असा आरोप एम. के. मढवी यांनी केला होता. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात याचा उल्लेख केला केला होता. शिंदे गट सत्तेचा गैरवापर करुन शिवसैनिकांना त्रास देत आहेत, हे सांगत दसरा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात एम. के. मढवी यांचा उल्लेख केला होता.

हे वाचलंत का :

  1. भाजपाकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, विद्यमान खासदाराचा पत्ता कट; निकम म्हणाले... - Ujjwal Nikam Lok Sabha Candidate
  2. उष्णता आणि राजकीय उदासीनतेमुळं महाराष्ट्रात मतांचा टक्का घसरला; अजून काय आहेत कारणं? - Lok Sabha Election 2024
  3. "...हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?", कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरे गटावर हल्लाबोल - PM Narendra Modi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.