ETV Bharat / state

"राज्यातील पहिलं क्रीडा विद्यापीठ...."; माजी क्रीडा मंत्र्यांचा 'ईटीव्ही भारत'बरोबर बोलताना सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप - Sunil Kedar About Sports University - SUNIL KEDAR ABOUT SPORTS UNIVERSITY

Sunil Kedar About Sports University : पुण्यातील क्रीडा विद्यापीठाचे काम रखडण्यास सत्ताधारी जबाबदार आहे, असा आरोप माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी केला आहे. क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचं बाकी असताना राज्यातील सरकार बदललं आणि हे क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला, असं मतही त्यांनी मांडलं.

Sunil Kedar About Sports University
सुनिल केदार (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 9:25 PM IST

सुनिल केदार पुण्यातील रखडलेल्या क्रीडा विद्यापीठाविषयी बोलताना (Reporter)

पुणे Sunil Kedar About Sports University : मी विदर्भातील असूनही पुण्यात राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सर्व मान्यता घेऊन फक्त हे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचं बाकी असताना राज्यातील सरकार बदललं आणि हे क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला. हे क्रीडा विद्यापीठ रखडण्यास केवळ सत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी केला आहे.

राज्यातील नवीन पिढीचं नुकसान : यावेळी माजी मंत्री सुनिल केदार म्हणाले की, मी क्रीडामंत्री असताना बालेवाडी येथील क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मी विदर्भातील असूनही पुण्यातील बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्यावर आरोप झाले. युजीसीकडून मास्टर्स, डिग्री कोर्सेस मंजूर करून आणले. यावर तज्ञांची नियुक्ती केली. सर्व काही असताना केवळ वर्ग सुरू होणे बाकी होते. आता हे विद्यापीठ का सुरू झालेलं नाही. विकासाच्या गप्पा मारणार्‍या भाजपा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या राज्यातील पहिल्या विद्यापीठाला खोडा घालण्याचे काम केलं आहे. राज्यातील नवीन पिढीचं नुकसान झालं असल्याचं यावेळी केदार यांनी सांगितलं.

धंगेकर हे विजयी होणार- केदार : पुण्याबाबत केदार यांना विचारलं असता ते म्हणाले की, पुणे शहरात काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध होणारा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, पुणेकर जनता आमच्या या उमेदवाराच्या मागे उभी राहणार आहे आणि धंगेकर हे विजयी होणार आहे.

'या' अभ्यासक्रमांवर देण्यात आला होता भर : पुण्यात क्रीडा विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान व क्रीडा प्रशिक्षण हे तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार होते. प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेशसंख्या निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर पुढील वर्षांमध्ये मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरू करता येतील. यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केदार यांनी व्यक्त केला होता. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन आणि विकास चांगल्या प्रकारे होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

हेही वाचा:

  1. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळं महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांमध्ये उत्साह; मुंबईत होणार सभा - Lok Sabha Election 2024
  2. ...तर दहा मिनिटं नवनीत राणा एकटी नाचेल; इम्तियाज जलील यांची जहरी टीका - lok sabha election
  3. संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.