ETV Bharat / state

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल; 'लॉरेन्स'बाबत पोलिसांचा मोठा दावा - Salman Khan House Firing Incident - SALMAN KHAN HOUSE FIRING INCIDENT

Salman Khan House Firing Incident : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Etv Bharat
लॉरेन्स बिश्नोई- सलमान खान (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 9:39 PM IST

मुंबई Salman Khan House Firing Incident : सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी विशेष मोक्का न्यायालयात १ हजार ७३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. हा गोळीबार 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाला होता. लॉरेन्स बिश्नोई हा या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार साबरमती तुरुंगात बंद असून, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि मित्र रोहित गोदारा कॅनडात लपलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

आरोपपत्रात मोठा दावा : लॉरेन्स बिश्नोईला दहशत निर्माण करून चित्रपट सृष्टीतील व्यक्तींकडून तसेच व्यावसायिकांकडून पैसे उकळायचे होते, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 46 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांचा मोक्का न्यायालयात कबुली जबाब नोंदवण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्यांचा सहकारी रोहित गोदारासह नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनमोल आणि रोहित दोघेही परदेशात आहेत. तर लॉरेन्स गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी राज्याच्या एसीएस होममार्फत केंद्र सरकारला पत्रही लिहिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी चार्जशीटमध्ये दावा केला आहे की, गुजरातमधील तापी नदीतून जप्त करण्यात आलेली दोन पिस्तुले आणि सलमान खानच्या घराजवळ सापडलेली पुंगळी फॉरेन्सिक चाचणीत जुळली होती, ज्यामध्ये ते एकच पिस्तूल असल्याचे समोर आले आहे.

सलमानकडून चिंता व्यक्त : या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने 4 जून रोजी अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचे जबाब नोंदवले होते, ज्यामध्ये सलमानने गोळीबाराच्या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि मुंबई पोलिसांच्या तपासाचे कौतुक देखील केले होते.

सलमान खानच्या घरावर गोळीबार : सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लॉरेन्स गॅंगकडून मोठा धोका आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अभिनेत्याच्या घरावर 5-6 राउंड गोळीबार केला आणि मुंबई शहरातून पळ काढला होता. वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अभिनेता आणि त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. तेव्हा शूटर्सनी पाच ते सहा राऊंड गोळीबार केला. सलमान खानने पोलिसांना सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून तो जागा झाला होता. चौकशी केली असता तो गॅलरीत गेला असता बाहेर कोणी नसल्याचे पाहिले. काही मिनिटांनी इमारतीत तैनात असलेले सुरक्षा रक्षक घरी आले आणि त्यांनी मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स याला २६८ कायद्यातील तरतुदीनुसार अटक करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य सरकारकडे कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली आहे.

हेही वाचा - सलमान खान गोळीबार प्रकरण; फॉरेन्सिक अहवालात 'ही' धक्कादायक माहिती आली समोर - Salman Khan Firing Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.