मुंबई Cylinder Blast Mumbai : चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील एका घरात गुरुवारी (1 फेब्रुवारी) रात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर घरामध्ये आग लागली होती. या आगीत 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
चेंबूर घटनेतील जखमींची नावे : संगीता गायकवाड, जितेंद्र कांबळे, यशोदा गायकवाड, नर्मदा गायकवाड, रमेश गायकवाड, श्रेयश सोनकांबळे या सहा जणांवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वृषभ गायकवाड, श्रेया गायकवाड या दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच संदीप जाधव यांच्यावरही शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाईंदरमध्येही घडली घटना : भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क येथील राम कृपा इमारतीच्या तळमजल्यावर सिलेंडरचा स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ही खोली भाड्याने देण्यात आली होती. यामध्ये राहणारे भाडोत्री खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यावेळी संजय नामक तरुण घरात होता. स्फोट झाल्याचा प्रचंड मोठा आवाज होऊन अवती-भवती असलेल्या इमारतीमधील काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच, जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्येही गॅस गळतीची घटना : छत्रपती संभाजीनग शहरातील सिडको चौकात काल (1 फेब्रुवारी) एलपीजी गॅस टँकर डिव्हायडरला धडकल्यानं मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली होती. सिडको उड्डाणपुलाच्या डिव्हायडरला एलपीजी गॅस वाहणाऱ्या टँकरनं धडक दिली. यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळं टँकरवर अग्निशमन दलाच्या 10 ते 12 टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला होता. यामुळं सदरील गॅस थंड राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. दरम्यान, सदर गॅस टँकरमुळं सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती.
हेही वाचा :
3 धोनी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत कधी येणार, पत्नी साक्षीनं दिलं 'हे' महत्वाचं अपडेट