ETV Bharat / state

भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग; 100 पेक्षा जास्त दुकानं आगीत भस्मसात - Fire Breaks Out in Pimpri Chinchwad

Fire Breaks Out in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड चिखली जाधववाडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडलीय. आगीत 100 पेक्षा जास्त भंगाराची दुकानं जळून खाक झालीत. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ही आग शुक्रवारी रात्री 1.30 च्या सुमारास लागली.

Fire Breaks Out in Pimpri Chinchwad
भीषण आग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 5:58 PM IST

पिंपरी चिंचवड शहरात भीषण आग

पिंपरी चिंचवड Fire Breaks Out in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी मळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग (Fire News) लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकानं आहेत. पिंपरी चिंचवड महानगरालिका आणि अन्य इतर संस्थांच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं जवळपास ६० पेक्षा अधिक वाहनांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.

अनधिकृत होते गोडाऊन : आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, प्रभारी अग्नीशमन अधिकारी मनोज लोणकर यांना दिलीय. हे गोडाऊन अनधिकृत होते. या संदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्या सेफ्टी सर्वेक्षणात या गोडाऊनची नोंद झाली होती का?, याबाबत त्यांना काही सूचना देण्यात आल्या होत्या? असे असा सवालही आता उपस्थित होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील अशा अनेक अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलय. पालिका प्रशासन आता तरी ठोस पावलं उचलणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

15 ते 16 गाड्या घटनास्थळी दाखल : आगीचं गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या एकूण 12 गाड्या, पुणे महापालिकेची 1, चाकण नगर परिषदची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसीची एक आणि टॅंकर अशा 15 ते 16 गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. आग विझवण्यासाठी 70 ते 72 गाड्या पाणी लागलं, तर सुमारे 70 ते 80 जवान कर्तव्यावर हजर होते.

गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची घेतली मदत : आग अटोक्यात येण्यासाठी पाच ते सहा तास लागले. येथे सात ते आठ एकरचा परिसर या आगीनं बाधीत झाला होता. आगीचे लोट पाहून नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दीड ते दोन हजार नागरिक येथे जमा झाले होते. त्यांचा आग विझवण्यात अडथळा येत होता. शेवटी आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला होता.

व्यावसायीकांनी सुरक्षेसंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक : चिखली-कुदळवाडी, जाधववाडी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भंगार सामानाची गोदामं आहेत. त्यातील 90 टक्के गोदामं ही अनधिकृत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेनं वेळोवेळी संबंधीत व्यावसयिकांवर कारवाई केली आहे. तरी देखील व्यावसायीक, महापालिकेच्या किंवा अग्निशमन दलाच्या नोटीसींना प्रतिसाद देत नाहीत. ना हरकत प्रमाणपत्र घेत नाहीत. योग्य त्या उपाययोजनांची पूर्तता केली जात नाही. येथे कोणतीही आग विझवण्याची यंत्रणा नाही. आसपास शाळा आणि रहिवासी परिसर आहे. त्यामुळं हा शहरातला अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील परिसर बनत आहे. आगीत ज्यांची दुकाने जळाली त्यांची नावे कळू शकलेली नाहीत. मात्र, त्यांनी त्वरीत सर्व कागदपत्रे आणि सुरक्षा व्यवस्थांची पूर्तता करावी असं आवाहन अग्निशमन दलाच्या वतीनं करण्यात आलय.

हेही वाचा -

  1. संभाजीनगरच्या 'त्या' आगीप्रकरणी महावितरणचा अहवाल; अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड - Sambhajinagar Fire Update
  2. तेलंगणाच्या सांगारेड्डीत रासायनिक कंपनीत अग्नितांडव; कंपनीच्या संचालकासह 6 जणांचा मृत्यू - Organic Factory Fire
  3. आगीत मृत्यू झालेल्या वसीम याने ठेवलेले स्टेटस चर्चेत, बायको होती आठ महिन्याची गर्भवती - chhatrapati sambhaji nagar fire

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.